केरळमधील पूरग्रस्तांसाठी मदतीचे आवाहन

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    27-Aug-2018
Total Views |
 
 
जळगाव :
केरळमध्ये झालेल्या प्रलयंकारी पावसामुळे जनजीवन पूर्णपणे उध्वस्त झाले आहे. १९२४ नंतर पहिल्यांदाच इतकी अतिवृष्टी झाल्यामुळे कल्पनेच्या पलीकडे जीवित आणि वित्तहानी झाली आहे. नागरिकांना आपली घरे सोडून आश्रयाला मदत शिबिरांमध्ये जावे लागले आहे. धान्य आणि केळी या बरोबरच अन्य नगदी पिके जमिनदोस्त झाल्यामुळे शेतीचे अपरिमित नुकसान झाले आहे. पावसाचा जोर लक्षात घेऊन धरण-बांधांमधून पाणी सोडावे लागल्याने अनेक रस्ते, पूल वाहून गेले आहेत. वीजपुरवठा खंडित झाला आहे. मच्छिमार बांधवांची उपकरणे पाण्याच्या प्रवाहात वाहून गेल्यामुळे त्यांचे आर्थिक गणित पूर्णपणे उध्वस्त झाले आहे.
 
 
केरळला या नैसर्गिक संकटातून बाहेर काढण्यासाठी आपली सैन्यदले अहोरात्र काम करत आहेत. विविध सेवाभावी संस्था यथाशक्ती मदतकार्य करीत आहेत. राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि राष्ट्रीय सेवा भारतीचे कार्यकर्ते केरळमध्ये प्रत्यक्ष मदतकार्य करत आहेत. केरळमधील परिस्थितीचा विचार करता केवळ मदतकार्य पुरेसे ठरणार नाही तर फार मोठ्या प्रमाणावर पुनर्वसनाचे काम दीर्घकाळ करावे लागणार आहे.
 
 
देशाच्या कानाकोपर्‍यातून मदतीचा ओघ सुरू झाला आहे. आपणही देशाचे नागरिक म्हणून कर्तव्य भावनेतून केरळमधील देशबांधवांच्या पाठीशी उभे राहण्याची गरज आहे. महाराष्ट्रात राष्ट्रीय स्वयंसेवक संघ जनकल्याण समितीने केरळमधील मदतकार्यासाठी निधी संकलन सुरू केले आहे. त्यामध्ये आपण यथाशक्ती योगदान देण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
 
 
देणगी देण्याचे विश्वासार्ह मार्ग:
देणगी आयकर कायद्यातील कलम ८० जी अन्वये सवलतीस पात्र
* रा.स्व.संघ जनकल्याण समिती (महाराष्ट्र प्रांत) या नावाने धनादेश काढावा.
* रा. स्व. संघ जनकल्याण समितीच्या www.rssjankalyan.org ह्या संकेतस्थळावर जाऊन DON­TE या टॅबद्वारे payment gateway ने आर्थिक मदत करू शकता.
* आपण आपली आर्थिक मदत जनकल्याण समितीच्या निधी संकलन केंद्रात देऊ शकता.
* जळगाव जनता सहकारी बँक, देवगिरी नागरी सहकारी बँक, भाग्यलक्ष्मी महिला सहकारी बँक आणि दीनदयाळ नागरी सहकारी बँक या बँकांचे शाखेत सुद्धा देणगी स्वीकारली जाईल.
 
@@AUTHORINFO_V1@@