अमेरिकेतील हॉटेलमध्ये गोळीबार ; तिघाजणांचा मृत्यू

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    27-Aug-2018
Total Views |



फ्लोरिडा : अमेरिकेतील फ्लोरिडा प्रांतामध्ये काही अज्ञान हल्लेखोरांनी एक हॉटेलमध्ये केलेल्या अंदाधुंद गोळीबारामध्ये ३ नागरिकांचा मृत्यू झाला असून ११ जण गंभीर जखमी झाले आहेत. दरम्यान हल्लेखोरांपैकी एका हल्लेखोराचा चकमकी दरम्यान मृत्यू झाला असून दुसरा हल्लेखोर पसार झाला आहे. त्याच्या शोध घेण्यासाठी फ्लोरिडा पोलिसांकडून शोधमोहीम सुरु करण्यात आली आहे.


फ्लोरिडामधील जॅक्सनव्हिल याठिकाणी ही घटना घडली आहे. जॅक्सनव्हिलमधील लँडिंग एरिया याठिकाणी असलेल्या एका हॉटेलमध्ये दोन अज्ञान हल्लेखोरांनी प्रवेश करत याठिकाणी असलेल्या नागरिकांवर बेछूट गोळीबार करण्यात सुरुवात केली. रविवारचा दिवस असल्यामुळे यावेळी हॉटेलमध्ये मोठ्या प्रमाणात गर्दी होती. त्यामुळे या गोळीबारामध्ये तीन नागरिकांचा मृत्य झाला तसेच ११ जण जखमी झाले. दरम्यान घटनेची माहिती मिळाल्यानंतर स्थानिक पोलिसांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेत आजूबाजूचे सर्व रस्ते बंद केले. तसेच नागरिकांच्या मदतीसाठी आणि हल्लेखोरांना पकडण्यासाठी दोन पथके तयार करण्यात आली. यानंतर जखमी नागरिकांना उपचारासाठी स्थानिक रुग्णालयात दाखल करण्यात आले, व हल्लेखोरांबरोबर झालेल्या चकमकीमध्ये एका हल्लेखोराला ठार करण्यात पोलिसांना यश आले.


दरम्यान एक हल्लेखोर अद्याप फरार असल्यामुळे पोलिसांकडून त्याचा शोध घेतला जात आहे. फरार आरोपीकडे शस्त्र असण्याची शक्यता पोलिसांनी व्यक्त केली आहे. त्यामुळे परिसरातील नागरिकांना सावध राहण्याचा इशारा पोलिसांनी दिला आहे. तसेच संशयित व्यक्ती आढळ्यास त्याविषयी त्वरित पोलिसांना माहिती देण्याचे आवाहन देखील पोलिसांनी केले आहे.
@@AUTHORINFO_V1@@