प्रदीप शर्मा बनले १२ हजार महिलांचे भाऊ!

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    27-Aug-2018
Total Views |


 

मुंबई : एन्काउंटर स्पेशालिस्ट म्हणून ख्याती असलेले धडाकेबाज पोलिस अधिकारी प्रदीप शर्मा यांना १२ हजार महिलांनी राख्या बांधल्या आहेत. हा एक प्रकारचा रेकॉर्ड असून विविध बचतगटाच्या १२ हजार महिलांचा यात समावेश होता. पीएस फाउंडेशनच्या वतीने गेल्या अनेक वर्षांपासून या कार्यक्रमाचे आयोजन केले जाते. यावर्षी अंधेरीच्या रामकृष्ण मंदिराच्या जवळील रिलॉन आर्केड येथे हा कार्यक्रम आयोजित केला होता.


बहीण-भावाच्या नात्याचा हा पवित्र सण मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. याच दिवसाचे औचित्य साधून या कार्यक्रमातील सहभागी महिलांनीआपल्या रक्षणकर्त्या भावाला राखी बांधून हा सण साजरा केला. मुंबई पोलीस दलात काम करत असताना शर्मा यांनी अनेक महिलांच्या समस्या सोडवल्या होत्या. त्यामुळे मुंबई परिसरात शर्मा यांना भाऊ मानणारा मोठा महिलावर्ग आहे. दरवर्षी महिला त्यांना मोठ्या आदराने राखी बांधतात. यावेळी शर्मा यांनी 'दै. मुंबई तरुण भारत'शी बोलताना म्हटले की, "पीएस फाउंडेशन गेल्या अनेक वर्षांपासून महिलांच्या सक्षमीकरणासाठी काम करत आहे. यामध्ये शिलाई क्लासेस, कॉम्पुटर क्लासेस आदी कार्यक्रम राबवत असतात. जो पर्यंत हे फाउंडेशन आहे तो पर्यंत हे काम अविरतपणे चालत राहील. तसेच सर्व जातीधर्मातील महिलांनी मला आपला भाऊ मानून राखी बांधली याचा आनंद आहे. महिलांचे व समाजाचे रक्षण करणे हे माझे कर्तव्य असून गरज पडेल तिथे मी त्यांच्या रक्षणासाठी नेहमीच उभा असेन."

 

 
 

गुन्हेगारी विश्वात 'प्रदीप शर्मा' नावाची दहशद

 

गुन्हेगारांचे कर्दनकाळ असलेले प्रदीप शर्मा हे मुंबई पोलिसमधील प्रसिद्ध अधिकारी आहेत. १९८३ साली दाखल ते पोलिस दलात दाखल झाले होते. याच दशकात मुंबईतील अंडरवर्ल्ड राज संपवण्यासाठी मुंबई पोलिसांनी एन्काऊंटर मोहीम राबवली होती. प्रदीप शर्मा यांचा या मोहिमेतील ३१२ एन्काउंटरमध्ये सहभाग होता तर त्यांनी आतपर्यंत ऑफिशियल ११३ एन्काउंटर केले आहेत. शर्मा यांचे नाव ऐकून आजही गुंडाना पळताभुई थोडी होते. शर्मा यांनी दाऊदचा भाऊ इकबाल कास्कर याला अटक केली होती तर लश्कर-ए-तैयबाच्या दहशदवाद्यांचा गोरेगाव येथे एन्काउंटर केला होता. त्यामुळे दाउद इब्राहीम पासून ते लश्कर-ए-तैयबाच्या दहशदवाद्यांपर्यंत शर्मा यांच्या नावाची दहशद आहे.

 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/

 
@@AUTHORINFO_V1@@