तेजिंदर पाल सिंहमुळे भारताला सातवे सुवर्ण पदक

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    26-Aug-2018
Total Views |

 
 
इंडोनेशिया :  इंडोनेशिया येथे सुरु असलेल्या १८ व्या आशियाई खेळांमध्ये भारताच्या खात्यात आणखी एक पदक जोडल्या गेलं आहे. गोळा फेक स्पर्धेत त्याने २०.७५ मीटर गोळाफेक करत एक विक्रम रचला आणि भारताला सातवे सुवर्ण पदक मिळवून दिले. यासोबतच भारताला २९ पदक मिळाले आहेत. ज्यामध्ये ७ सुवर्ण, ५ रजत आणइ १७ कांस्य पदकांचा समावेश आहे.
 
 
 
 
पंजाब येथील रहिवासी तेजिंदर पाल याने शॉटपुट स्पर्धेत अविस्मरणीय प्रदर्शन करत सुवर्ण पदक मिळवले. त्याने चीनच्या ल्यू यांग याला मागे सारत ही अविस्मरणीय कामगिरी केली.
 
 
 
यामुळे कझाकिस्तानच्या इवानोव याला तिसऱ्या स्थानावर समाधान मानावे लागले. भारातची कामगिरी आशियाई खेळांमध्ये दिवसेंदिवस आणखी उत्तम होत चालली आहे. आजच्या मन की बात या कार्यक्रमात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देखील भारतीय खेळाडूंचे कौतुक करत त्यांना शाबासकी दिली आहे. तसेच तेजिंदरचे देखील त्यांनी कौतुक केले आहे.
@@AUTHORINFO_V1@@