शहाड उड्डाणपूलावरील वाहतूककोंडीची समस्या होत आहे गंभीर

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    26-Aug-2018
Total Views |


 

टिटवाळा:- शहाड उड्डाणपूलावर होत असलेली वाहतूक कोंडीची समस्या ही दिवसेंदिवस गंभीर होत चालली असून येथून प्रवास करणाऱ्या वाहनचालकांना आनिओ प्रवाश्याना १५ मिनिटांच्या प्रवासासाठी दोन दोन तास येथील वाहतूक कोंडीत अडकावे लागत आहे. या वाहतूक कोंडीमुळे रुग्णवाहिका,शाळेच्या स्कूल बस,व्हॅन, शालेय विद्यार्थ्यांची वाहतूक करणार्‍या रिक्षा तसेच अन्य प्रवासी वाहने या ठिकाणी अडकून पडल्याचे रोजचेच पाह्याला मिळते.
 

गेल्या अनेक वर्षांपासून शहाड येथील एकमेव उड्डाणपुलाचा वापर कल्याणहुन निघाल्यानंतर मुरबाड तर पुढे नगरकडे तसेच उल्हासनगर येथे जाण्यासाठी केला जात आहे. उल्हासनगरकडे जाणाऱ्या वाहनचालकांना याच पुलालागत यु टर्न घ्यावा लागतो, तर उल्हासनगरहुन कल्याणला जाणाऱ्या वाहनांना देखील पुलाखालून आल्यानंतर यु टर्न घेऊन पुलावर वर चढावे लागते. तर कल्याण मुरबाड मार्गे ये-जा करणारी वाहने सरळ येतात. या वाहनांनमध्ये मोठमोठे कंटेनर ,सिमेंट मिक्सर, डंपर रेती व खडीच्या गाड्या यासारख्या अवजड वाहनांची देखील सतत वाहतूक होत असल्याने या ठिकाणी वाहतूक कोंडीची प्रचंड समस्या सातत्याने निर्माण होत असते. वाहतुकीच्या नियमांचे उल्लंघन करत बेशिस्तपणे वाहने चालवणारे वाहनचालक,त्यांच्यावर अंकुश नसलेले वाहतूक पोलीस आणि रस्त्यांची खड्यांमुळे झालेली चाळण या साऱ्यांमुळे शहाड उड्डाणपुलावर सतत वाहतूक कोंडी झाल्याचे चित्र पाह्याला मिळत आहे.

 

रोजच्याच होणाऱ्या या वाहतूक कोंडीमुळे बिर्ला गेट शहाड या परिसरांतील स्कूलबसने ये-जा करणाऱ्या विविध शाळांतील विद्यार्थ्यांना नाहक त्रास भोगावा लागत आहे. तासनतास या ठिकाणी बसेस अडकून पडल्याने विद्यार्थी मेटाकुटिला येतात. कल्याण मुरबाड नगर या ठिकाणी जाणाऱ्या लांब पल्याची एसटी व खाजगी जीप मध्ये प्रवासी अडकून प्रवासी अडकून पडल्याच्या घटना रोज घडत आहेत. पाच मिनिटांच्या प्रवासासाठी तासान तास या पुलावर वाहतूक कोंडीमुळे अडकून रहावे लागते. जुलै महिन्यात वनमहोत्सवच्या कार्यक्रमाला राज्याचे मुख्यमंत्री मुरबाड रोडवरील म्हारळ -कांबा येथे वृक्ष रोपणाच्या वेळीं आले असताना या रस्त्याला चकाचक करण्यात आले होते. मात्र त्यानंतर पुन्हा या रस्त्याची अवस्था जैसे थे झालेली दिसून येत आहे.

 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/

 
@@AUTHORINFO_V1@@