संपूर्ण भारतातील जनता केरळच्या पाठीशी आहे : पंतप्रधान

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    26-Aug-2018
Total Views |

 
नवी दिल्ली : केरळ येथे पूर आल्यामुळे मोठ्या प्रमाणात जनजीवन पूर्णपणे विस्खळित झाले आहे. अनेकांनी आपला जीव गमावला आणि आपल्या जवळच्या लोकांना गमावले. मात्र या संकटाच्या काळात संपूर्ण भारत देश केरळच्या पाठीशी उभा आहे. आपल्या संवेदना केरळ पूर पीडित नागरिकांसोबत आहेत. अशा भावना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज मन की बात या कार्यक्रमाच्या माध्यमातून व्यक्त केल्या आहेत.
 
 
 
 
केरळ येथील परिस्थिती लवकरच पूर्वपदावर येईल. असेही ते यावेळी म्हणाले. केरळमध्ये आलेल्या संकटात भारतीय आर्मी, भारतीय हवाई दल, सीमा सुरक्षा दल, केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दल, राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दल तसेच देशातील सहकार्य करणाऱ्या सर्वांचे मोदींनी कौतुक केले.

 
त्यांनी आज रक्षाबंधनाच्या दिनानिमित्त भारतवासियांना शुभेच्छा दिल्या आहेत. तसेच येत्या महिन्यात येणाऱ्या शिक्षक दिनाविषयी त्यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत. मोदांनी शिक्षक दिनानिमित्त सर्व शिक्षकांना शुभेच्छा दिल्या. तसेच देशाचे माजी राष्ट्रपती डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांनाही अभिवादन केले.
 
 

देशाचे माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांच्या निधनाबद्दलही मोदींनी शोक व्यक्त केला. अटलबिहारी वाजपेयी हे एक विशाल व्यक्तिमत्व होते. त्यांनी देशाला राजकीय संस्कृती दिली आहे. त्यांच्या कार्याचा देशाला खूप लाभ झाला असल्याचेही मोदी यावेळी म्हणाले. "गेली १० वर्षे ते सक्रीय राजकारणापासून लांब होते. १० वर्षांचा काळ खूप मोठा असतो. मात्र तरीही १६ ऑगस्टला देशवासियांचे अटलजींवर असलेले प्रेम सगळ्यांनीच बघितले." असेही ते यावेळी म्हणाले.
 
आशियाई खेळांमध्ये ज्या ज्या खेळाडूंनी यश मिळवले त्या सर्वांचे मोदींनी अभिनंदन केले. या सर्व खेळाडूंनी आपल्या देशाचे नाव उज्वल केले असल्याचे ते म्हणाले. पदक जिंकणाऱ्या खिळाडूंमध्ये जास्त मुलींची संख्या आहे. त्यामुळे हा सकारात्मक संकेत असल्याचेही मोदी म्हणाले.
 
 
१५ सप्टेंबरला येणाऱ्या अभियंता दिनाच्याही मोदींनी सर्वांना शुभेच्छा दिल्या. आपल्या देशाला रचनात्मक अभियंत्यांची खूप गरज आहे. भारतरत्न डॉ. एम. विश्वेश्वरय्या यांनी कावेरी नदीवर कृष्णराज धरणाची संकल्पना मांडून खूप मोठे काम केले आहे. त्यामुळे लाखो शेतकऱ्यांना त्याचा फायदा झाला आहे.
बलात्कार करणाऱ्या आरोपींच्या विरोधात कारवाई करण्यासाठी सरकारने खूप मोठे पाऊल उचलले आहे. त्यासंदर्भात संसदेत विधेयक मंजूर करुन आरोपींना कठोर शिक्षेची तरतुद केली असल्याचे ही मोदी यांनी यावेळी सांगितले.
@@AUTHORINFO_V1@@