सापसुरळी

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    26-Aug-2018
Total Views |



 

 

सापसुरळी हे नाव ऐकलं की आपल्या समोर आधी साप हाच सरपटणारा आणि विषारी प्राणी डोळ्या समोर येतो. पण या सापसुरळी मध्ये आणि सापामध्ये काहीही साम्य नाही. जेवढा आहे तेवढा फक्त नावापुरता आहे. त्यामुळे सापसुरळीला घाबरण्याची काही गरज नाही.
 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/

 
आपल्या घरातील भिंतींवर किंवा आसपासच्या परिसरात ज्या काही पाली आपण बघतो अगदी तशीच सापसुरळी दिसतेसापसुरळी ही सापाची मावशी चोपई या स्थानिक नावांनी सुद्धा ओळखली जाते. यूरोप,आफ्रिका आशिया या तिन्ही खंडात सापसुरळीच्या तब्बल ४० प्रजाती असून ६०० जाती आहेतसापसुरळी हा सरीसृप वर्गाच्या स्किंकिडी कुलातील प्राणी म्हणून ओळखला जातोसापसुरळीची गणनासुद्धा सरपटणाऱ्या प्राण्याच्या वर्गात होते.
 

सापसुरळीच्या वेगवेगळ्या जातींमध्ये त्याची लांबी हि १० सेंटीमीटर ते ५५ सेंटीमीटर पर्यन्त असतेपालीप्रमाणे चार पाय असूनही ती अत्यंत जलद गतीने पळू शकतेतिच्या चारही पायांना प्रत्येकी पाच बोट असतात. त्यामधील पाठीमागच्या पायाच्या बोटामध्ये अंगठयाबाजूच्या बोटाची उंची ही बाकीच्या बोटापेक्षा जास्त असते. त्यामुळे तिला जलद गतीने पळता येते. त्याचबरोबर तिच्या डोक्याचा आकार त्रिकोणी नाजूक असतो. तिची पाठ करड्या रंगाची असून बाह्यावरण ऑस्टिओडर्मपासून बनलेल्या चकचकीत खवल्यांसारखे असते. खवल्यांचा आतील भाग हा पूर्णपणे हाडांनी बनलेला असतो. शेपटीचा आकार हा लांब असून ती पालीप्रमाणे लगेच तुटते.

 
सापसुरळीला जास्त वेळ हातात धरून ठेवता किंवा पकडता येत नाही. ती सिमेंटच्या भिंतीवर चालू शकते. सापसुरळ्यांमध्ये घाणेंद्रिय तीक्ष्ण असून, काही वाळवंटी जातीतील सापसुरळी जमिनीत पुरलेले कीटकही शोधून काढतात. सापसुरळी ( माबुया कॅरिनॅटाभारतात स्किंकिडी कुळामधील माबुया लायगोसोमा, लिओलॉपिझ्मा या प्रजातींतील सापसुरळ्या आढळतात. माबुया प्रजातीमध्ये सुद्धा तबबले १०५ पोटजाती आहेत. माबुया कॅरिनॅटा ही सामान्य भारतीय जाती असून ती जंगलांत आढळते. ती जमिनीवर राहणारी असून दिनचर म्हणजेच दिवसा सर्वत्र फिरणारी आहे. तिची लांबी सुमारे २९ सेंमी. असून शरीराचा वरील बाजूचा रंग तपकिरी, हिरवट वा काळपट असतो, तर खालील बाजू ही पांढरी किंवा पिवळसर रंगाची असते. कीटक लहान पृष्ठवंशी प्राणी हे तिचे अन्न आहेदक्षिण आशिया म्हणजेच भारतासोबतच ती ,बांग्लादेश, म्यानमार,मालदीव, नेपाळ आणि श्रीलंका ,भूतान या देशामध्ये सुद्धा आढळून येते .
 

- पराग गोगटे

 
 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/

@@AUTHORINFO_V1@@