भारतीय व जागतिक भूकंपशीलता भाग ५

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    26-Aug-2018   
Total Views |


 

भारतात भूकंप झाल्याची बरीच उदाहरणे आहेत. या भूकंपांमध्ये शेकडो, हजारो लोकांचे बळी गेले आहेत. तसेच मोठ्या प्रमाणात वित्तहानीही झालेली आहे. यामुळेच आपण ज्या भागात राहतो, त्या भागातील भूकंपांच्या इतिहासाची (Seismic History) माहिती आपल्याला असणे आवश्यक आहे. या भागात आपण भूकंपशीलतेवरून (Seismicity) ठरवलेले भारतातील विविध विभाग बघू, तसेच भारतातील जगातील काही प्रलयंकारी भूकंपांची उदाहरणे बघू.

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/

 

कंपाची वारंवारता (Frequency) तीव्रता (intensity) यांनुसार भारताचे मुख्यतः विभाग (zones) पाडण्यात आले आहेत. हे वर्गीकरण कित्येक वर्षांच्या अभ्यासावरून भूकंपांच्या आजवरच्या इतिहासावरून करण्यात आले आहे. हे विभाग खालीलप्रमाणे

 

1. सर्वाधिक तीव्रतेचा विभाग (ZONE of Maximum intensity )

या विभागामध्ये भूकंपाची तीव्रता वारंवारता इतर विभागांच्या तुलनेने जास्त असते. या विभागात संपूर्ण जम्मू आणि काश्मीर, हिमाचल प्रदेश, सर्व ईशान्येकडील राज्ये तसेच पंजाब, उत्तर प्रदेश, दिल्ली यांचा उत्तर भाग आदींचा समावेश होतो. यात संपूर्ण हिमालय पर्वतरांग, तसेच काराकोरम रांग शिवालिक टेकड्यांचाही समावेश होतो. भारतातील तसेच आसपासच्या देशांमधील (नेपाळ, पाकिस्तान, .) काही मोठे भूकंप याच भागात होऊन गेले आहेत. या भागांमध्ये कायमच भूकंपाचा धोका असतो.

 

2. मध्यम तीव्रतेचा विभाग (Zone of intermediate intensity )

या विभागात गंगा नदीचे पठार तसेच हरियाणा, पंजाब, उत्तर प्रदेश, राजस्थान, मध्य प्रदेश, बिहार, बंगाल, ओडिशा यांचा दक्षिण भाग आणि महाराष्ट्र गुजरात यांचा उत्तर भाग यांचा समावेश होतो. साधारणपणे येथील भूकंपाची तीव्रता सहा ते आठ रिश्टर स्केल एवढी असते.

 

3. कमी तीव्रतेचा विभाग (Zone of minimum intensity) या विभागात संपूर्ण दक्षिण भारत येतो. दक्षिण भारताला भारतीय द्वीपकल्प (penisculer india ) असेही म्हणतात. कारण, याच्या तिन्ही बाजूंना समुद्र आहे. या विभागात पृथ्वीच्या इतिहासात फारच कमी भूकंपाची नोंद आढळते. याचा एकमेव अपवाद म्हणजे १९६७ चाकोयना भूकंप.’ ज्यात फार मोठ्या प्रमाणात जीवित वित्तहानी झाली. पण संशोधकांनी सिद्ध केले आहे की, तो भूकंप पृथ्वीच्या अंतर्गत हालचालींमुळे झालेला नसून कोयना धरणाच्या प्रचंड जलाशयामुळे झाला. त्यामुळे असे म्हणण्यास हरकत नाही की, हा विभाग भूकंपशीलतेच्या दृष्टीने संतुलित (stable) आहे.

 

जगात आत्तापर्यंत जे भूकंप किंवा अधिक रिश्टर स्केलच्या तीव्रतेचे झाले आहेत, ते सबडक्शन झोन्स् (subsidien zone- याची सविस्तर माहिती नंतरच्या एका लेखात होईलच) मध्येच झाले आहेत. प्रत्येकच भूकंप महाभयंकर असून प्रचंड जीवितहानी वित्तहानी करून गेलेला आहे. याविषयी माहिती घेऊ. सुरुवात भारतापासून करू.

 

1. २००४ चा अंदमान बेटांजवळील भूकंप -

२६ डिसेंबर, २००४ रोजी जावा सुमात्रा बेटांजवळील बंगालच्या उपसागरात हा भूकंप झाला. याची तीव्रता रिश्टर स्केलवर . ते . होती. सुमारे १० मिनिटे या भूकंपाचे हादरे बसत होते. हा भूकंप इंडियन प्लेट (Indian plate) ही बर्मा मायनर प्लेटच्या (Burma miner plate) खाली गेल्यामुळे तयार झालेल्या सबडक्शन झोनमध्ये झाला. समुद्राखाली झाल्यामुळे या भूकंपातून जवळजवळ ३० मीटर उंचीच्या त्सुनामी लाटा निर्माण झाल्या संपूर्ण बंगालच्या उपसागरातून प्रवास करत पार आफ्रिकेपर्यंत पोहोचल्या. जिथे गेल्या तिथे त्यांनी अतोनात नुकसान केले. सर्वांत जास्त नुकसान सुमात्रामधल्या अके शहरात झाले. या प्रलयात दोन लाखांहून अधिक लोकांचे बळी गेले. भूकंप समुद्राखाली झाल्यामुळे प्रत्यक्ष भूकंपामुळे झालेले नुकसान कमी होते, तर जास्त नुकसान त्सुनामीमुळे झाले.

 

2. २०११ चा जपानचा भूकंप -

११ मार्च, २०११ रोजी जपानच्या समुद्रात फार मोठा भूकंप झाला. याची तीव्रता . रिश्टर स्केल एवढी होती. हाही भूकंप समुद्राखालीच झाल्यामुळे यातूनही जवळजवळ ४० मीटर उंचीच्या त्सुनामी लाटा निर्माण झाल्या. त्यांनी जपानच्या पूर्व किनाऱ्याची नासधूस केली. यांचाच परिणाम म्हणून जपानच्या फुकूशिमा येथील अणुप्रकल्पातील अणुभट्टीतून घातक किरणोत्सर्ग सुरू झाला. या भूकंपात सुमारे १६ हजार लोक मृत्युमुखी पडले, तर ३६० अब्ज डॉलर्सचे नुकसान झाले. हा जपानमधील आजवरचा सर्वात हाहाकारी भूकंप आहे.

3. १९६४ चा अलास्कामधील भूकंप -

२७ मार्च, १९६४ साली सायंकाळी सुमारे साडेपाच वाजता दक्षिण-मध्य अलास्का येथे हा भूकंप झाला. हा भूकंप दी गुड फ्रायडे अर्थक्वेक (the good Friday earthquake) म्हणूनही ओळखला जातो. भूकंपाची तीव्रता रिश्टर स्केलवर . एवढी होती. साधारण साडेचार मिनिटे भूकंपाचे धक्के बसत होते. या भूकंपात सुमारे १३९ जणं दगावले. यात फारशी जीवितहानी झाली नसली, तरी अमेरिकेला ३११ दशलक्ष डॉलर्स इतक्या प्रचंड आर्थिक नुकसानाला सामोरे जावे लागले. भूकंपामुळे काही भाग ३० फुटांपर्यंत वर उचलले गेले आजही तसेच आहेत.

 

4. १९५२ चा रशियामधील भूकंप -

नोव्हेंबर, १९५२ रोजी पहाटे साधारण पाच वाजता रशियाच्या कामचत्का द्वीपकल्पाजवळ (kamchtma, russia) समुद्रात हा भूकंप झाला. याची तीव्रता रिश्टर स्केलवर इतकी होती. या भूकंपामुळे १८ मीटरपर्यंतच्या त्सुनामी लाटा उठल्या त्यांनी आसपासचा सर्व भाग जलमय करून तेथील रहिवाशांचा बळी घेतला. या भूकंपात सुमारे हजार ४०० लोकांचे प्राण गेले.

 

5. १९६० चा चिलीमधील भूकंप -

२२ मे, १९६० रोजी दुपारी साधारण सव्वातीन वाजता चिलीमधील वाल्डिव्हिया (validva,chili) येथे हा भूकंप झाला. हा पृथ्वीच्या आजवरच्या ज्ञात इतिहासातील सर्वात शक्तिशाली भूकंप आहे. याची तीव्रता रिश्टर स्केलवर . ते . इतकी होती. यातून निर्माण झालेल्या २५ मीटर उंचीच्या त्सुनामी लाटांनी चिलीमध्ये तर हैदोस घातलाच, पण त्या संपूर्ण प्रशांत महासागर पार करून अगदी जपान, फिलिपाईन्सपर्यंतही पोहोचल्या तिथेही हाहाकार माजवला. जपानला पोहोचेपर्यंत त्यांची उंची ११ मीटरपर्यंत खाली आली होती. तरीसुद्धा ही उंची खूप असते. त्यांच्या वाटेतच असलेल्याहवाईसारख्या बेटांवरही प्रलय कोसळला. जीवितहानीची अचूक नोंद उपलब्ध नाही, पण हा आकडा एक हजार ते सात हजारच्या दरम्यान असावा, असा अंदाज आहे.

 
 

लिहिण्यासारखे अजून बरेच आहे, तरी जागेअभावीभूकंपहे प्रकरण आपण आता इथेच संपवू. पुढील लेखात अशाच दुसऱ्या एका मनोरंजक गोष्टीवर चर्चा करू.

 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/


@@AUTHORINFO_V1@@