पुणे विद्यापीठात ऑनलाईन बिंदुनामावली नोंदवही लिहिण्यासंदर्भात कार्यशाळा

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    25-Aug-2018
Total Views |
 
 
 
पुणे : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाशी संलग्न असलेल्या अनुदानित, विना अनुदानित, व कायम विना अनुदानित महाविद्यालयांमधील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांसाठी अद्ययावत शासन निर्णयानुसार ऑनलाईन पद्धतीने बिंदुनामावली नोंदवही लिहिणे आणि सांख्यिकीय माहिती (अनुशेष) संकलित करण्याचे प्रशिक्षण देण्यासंदर्भात नुकतीच कार्यशाळा आयोजित करण्यात आली होती. विद्यापीठामधील आरक्षण कक्षाकडून या कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते.
 
या कार्यशाळेचे उद्घाटन मा. प्र. कुलगुरु डॉ. एन. एस. उमराणी यांच्या हस्ते करण्यात आले. दिनांक २० व २१ ऑगस्ट याकालावधीत पुणे शहर कर्मचाऱ्यांसाठी; तर २३ ते २४ या कालावधीत पुणे जिल्ह्यामधील कर्मचाऱ्यांसाठी या कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यशाळेस उस्फ़ुर्त प्रतिसाद मिळाला. या कार्यशाळेमध्ये संलग्नित महाविद्यालयांच्या २६४ प्रतिनिधींनी सहभाग नोंदविला.
 
या कार्यशाळेसाठी सामान्य प्रशासन विभाग, १६-ब, मंत्रालयामधील घुले अपर सचिव, अरविंद मोरये कक्ष अधिकारी, पूजा मानकर कक्ष अधिकारी, स्नेहा किसवे-देवकाते सहायक आयुक्त, मावक, पूने यांनी मार्गदर्शन केले. कुलसचिव डॉ. अरविंद शाळिग्राम यांनीही या कार्यशाळेस संबोधित करत या विषयाचे महत्त्व पटवून दिले.
 
@@AUTHORINFO_V1@@