मुंब्रा, दिव्याला मुबलक पाणी मिळणार

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    25-Aug-2018
Total Views |




 


ठाणे : घोडबंदरच्या पाणी वितरण व्यवस्थेच्या रिमॉडेलिंगच्या प्रस्तावानंतर आता ठाणे महानगरपालिकेने त्याच तत्त्वावर मुंब्रा आणि दिव्याची तहान भागवण्याचा निर्णय घेतला आहे. ठाणे महानगरपालिकेच्या महासभेत हा प्रस्ताव पटलावर ठेवण्यात आला. दरम्यान, हे काम पालिकेतर्फेच करण्यात येणार असून यासाठीचा खर्च आता १९६ कोटींच्या घरात गेला आहे.

 

पाणी वितरण व्यवस्थेच्या रिमॉडेलिंगमुळे मुंब्रा आणि दिव्याचीही आता तहान भागवली जाणार आहे. हे काम महानगरपालिका स्वत: करणार असून लागणाऱ्या खर्चात ६९ कोटींची वाढ झाली असून यामध्ये दिव्याचा समावेश केल्यामुळे ही वाढ झाल्याचे पालिकेचे म्हणणे आहे. पालिकेच्यावतीने मुंब्र्यातील पाणी वितरण व्यवस्थेचे रिमॉडेलिंग प्रकल्पाचा अहवाल तयार करण्यात आला होता. त्यावेळी यासाठी ९७.४१ कोटींचा खर्च अपेक्षित होता. परंतु निधी उपलब्ध न झाल्यामुळे ही योजना बारगळली आणि बंद झाली. त्यानंतर केंद्र सरकारच्या अमृत योजनेद्वारे ही योजना मार्गी लावण्याचे प्रयत्न पालिकेतर्फे करण्यात आले. परंतु केंद्राकडूनही या योजनेला मान्यता मिळाली नाही. त्यानंतर पालिकेने स्वत: ही योजना राबविण्याची तयारी सुरू केली. मुंब्र्याच्या लोकसंख्येच्या तुलनेत सध्या असलेले जलकुंभ हे २०११ पर्यंतच पाणी पुरवठा करण्याइतके होते. आता त्यात वाढ होणे अपेक्षित असून त्यानुसार पाणी वितरण व्यवस्थेचे रिमॉडेलिंग करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. यासाठी १२६ कोटींचा खर्च अपेक्षित होता. परंतु आता त्यामध्ये दिव्याचाही समावेश करण्यात आल्याने हा खर्च आता १९६ कोटींच्या घरात जाणार आहे. दरम्यान, सदर प्रस्ताव हा महासभेत मंजुरीसाठी पटलावर ठेवण्यात आला आहे. तसेच पाणी पुरवठ्यासाठी नियोजित वर्ष २०१८ धरण्यात येणार असून पुढील ३० वर्षांसाठी वहन आणि वितरण व्यवस्था गृहीत धरण्यात येणार आहे. तसेच यानुसार २०० मिमी ते १ हजार मीमी व्यासाच्या १८ किलोमीटरच्या जलवाहिन्या टाकण्यात येणार आहेत. तसेच या कामासाठी सल्लागाराचीही नेमणूकही करण्यात येणार आहे. तसेच इतर कामांसह नव्याने १० जलकुंभ बांधण्यात येणार आहे. २०१८-१९ या वर्षात ३० कोटी, २०१९-२० मध्ये ९० कोटी आणि २०२०-२१ या कालावधीत ७६ कोटी रूपये खर्च करण्यात येणार आहेत.

 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/
 
@@AUTHORINFO_V1@@