बा! सिद्धू...!

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    25-Aug-2018   
Total Views |


 

प्रिय नवज्योतिंसग सिद्धू, साष्टांग दंडवत! हो बाबा, परवा जो कारनामा तू केलास त्यानंतर तर साष्टांग दंडवतच घालायला हवा ना तुला! कायम भारताच्या विरोधात बरळणारा, वागणारा, क्रिकेटचा मैदानी खेळही इमानदारीने न खेळणारा, त्यातही सामना भारताविरुद्ध आहे म्हटलं की चवताळून उठणारा पाकिस्तान टीमचा कधीकाळी म्होरक्या राहिलेला इम्रान खान त्या देशाचा पंतप्रधान झाला म्हणून आनंदाला उधाण येणे वा त्याच्या शपथविधी सोहळ्याचे नुसते निमंत्रण मिळाले तरी हुरळून जाणे तुझ्या प्रतिष्ठेला शोभत नाही रे बाबा. हे खरं आहे की, अलीकडे तुझी डिमांड, निदान भारतात तरी प्रामुख्यानंकॉमेडी शोपुरती उरली आहे. पण, म्हणून दरवेळी स्वत:चं हसंच करून घेतलं पाहिजे, असं कुठे आहे राजा? शिवाय, असल्या एखाद्या सोहळ्याचं निमंत्रण मिळणं एवढं पुरेसं असतं? अरे, निमंत्रणं तर ढीगभर वाटलीत त्यांनी. मिळालं तरी कुठलं निमंत्रण स्वीकारायचं अन्कुठलं टाळायचं, एवढं तर ठरवता आलं पाहिजे ना आपल्याला?
 
जे कपिल देव, सुनील गावसकरांना कळलं ते तुला उमगलं नाही, याहून वेदनादायी काय असेल सांग? अर्थात, यात तुझाही दोष नाही म्हणा! इतर सार्या बाबींपुढे इम्रानशी असलेली मैत्री महत्त्वाची वाटली तुला. त्याच्याशी इमान राखण्यात धन्यता वाटली. तिकडे पोहोचल्यावर पाकिस्तानच्या लष्करप्रमुखाला मिठी मारण्यातही काहीच गैर वाटलं नाही... सार्या देशाला शरम वाटली रे तुझ्या त्या कृत्याची अन्तू? वर पुन्हा, उजागरीनं स्वत:च्या त्या वागण्याचं समर्थन करत फिरतोयसतुझ्यातल्या खेळाडूला लाख सलाम! तुझ्यातल्या प्रभावी वक्त्याला, हजरजवाबी, हरहुन्नरी कलावंतालाही त्रिवार कुर्निसात! कुठल्याही प्रसंगाला साजेशी अशी शायरी तर एकदम लाजवाब! ती पेश करण्याची तर्हा तर त्याहून सरस. पण...
 

पण, परवाचं तुझं वागणं मात्र कुणालाच अजीबात पटलेलं नाही बघ. एका निमंत्रणावरून उतावीळपणे थेट पाकिस्तानच्या दिशेने झेपावण्यापूर्वी एकदा आपल्या देशातल्या लोकांच्या भावभावनांचा, आपल्या चाहत्यांच्या वैचारिक प्रवाहाचाही विचार करायला हवा होता ना सिद्धूजी आपण. तसं म्हटलं तर फरक कशानेच काहीच पडत नाही. एक नवज्योतिंसग सिद्धू इम्रान खानच्या शपथविधी सोहळ्याला उपस्थित राहिल्याने ना भारताची मान शरमेने खाली गेली, ना पाकिस्तानची मान अभिमानाने उंचावली. वैश्विक पातळीवरील राजकारणाची अपरिहार्यता म्हणून दोन देशांच्या प्रमुखांना गळाभेटीची नौटंकीही करावी लागते बर्याचदा जगालादाखवण्यासाठी’... पण, सिद्धूंसमोर तर अशी कुठलीच राजकीय अपरिहार्यता उभी ठाकली नव्हती. त्यांना कुठल्या प्रशासनिक संकेतांचे पालनही करायचे नव्हते, की प्रोटोकॉलचाही भार नव्हता डोक्यावर. बरं, गेलेच होते मित्राच्या प्रेमाखातर, तर शपथविधी सोहळ्याला उपस्थित राहायचं अन्परतायचं ना गुमान! पण, नाही. साहेब, तुम्ही तर गेलात थेट तिथल्या लष्करप्रमुखाला भेटायला. जावेद बाजवा यांची गाठ पडल्यावर स्वत:ला आवरता तरी यायला हवं होतं. पण, दुर्दैवाने तसंही घडलं नाही. तुम्ही तर थेट मिठीच मारली बाजवांना

 

तिही हसतमुखाने. कडकडून. उपस्थितांच्या कॅमेर्यांचे फ्लॅश उडाले पटापट अन्तमाम भारतीयांना कळली बातमी- भारतातील पंजाब नामक एका राज्याच्या प्रांत सरकारमधील नवज्योतिंसग सिद्धू नामक एका मंत्र्याने पाकिस्तानच्या लष्करप्रमुखाची गळाभेट घेतल्याची. तसे करताना त्यांना किंचितशीही खंत वाटली नसल्याची... सीमेवर 24 तास पावसात, उन्हा-तान्हात तैनात असलेल्या भारतीय जवानांना जिवानीशी मारण्याचे षडयंत्र रचणारा आणि आपल्या सैनिकांकरवी त्याची कठोर अंमलबजावणी करवून घेण्यासाठी धडपडणारा, सीमेपलीकडचा एकही जवान शहीद झाला तरी ज्याला आनंदाच्या उकळ्या फुटतात, तो निर्दयी अधिकारी तो हाच, याची कल्पना सार्या भारताला आहे, पण पाकिस्तानच्या निर्मितीचे चटके ज्यांनी वर्षानुवर्षे सहन केले, पाकड्यांच्या षडयंत्रातून जन्माला आलेल्या दहशतवादाची झळ ज्यांनी वर्षानुवर्षे सोसली, खलिस्तानच्या मागणीपासून तर सुवर्णमंदिर ताब्यात घेण्यापर्यंतच्या त्यांच्या नापाक कारवायांचा जो साक्षीदार राहिला त्या पंजाबातील जनतेचे प्रतिनिधित्व करणार्या सरकारमधील एका जबाबदार मंत्र्याला दोन देशांतील संबंधांच्या तुलनेत स्वत:च्या वैयक्तिक मैत्रीला अधिक महत्त्व द्यावेसे वाटावे, याहून दुर्दैवी बाब ती कोणती असणार?

 

क्रिकेटचे मैदान असो की मग राजकारणाचा आखाडा, भारताच्या बाबतीतली इम्रान खानची भूमिका सहानुभूतीची कधीच राहिली नाही. उलट, हिंदुस्थानविरुद्धचा द्वेष आणि रोषच त्याच्या वर्तणुकीतून वारंवार सिद्ध होत राहिला आहे. पण, आता तो पाकिस्तानचा पंतप्रधान झालाय्म्हटल्यावर, असमर्थनीय असले तरी त्याचे जुने सगळे आक्षेपार्ह वागणे विसरून त्याची गळाभेट घेणे ही तर भारताच्या पंतप्रधानांसाठीचीही अपरिहार्यता ठरणार आहे येत्या दिवसात. इच्छा असो वा नसो, त्यांना इम्रानशी हसतमुखानेच भेटावे लागणार आहे. नवज्योतिंसग सिद्धू नावाच्या एका भारतीय नागरिकासाठी मात्र तसली कुठलीच अपरिहार्यता पुढ्यात उभी ठाकली नव्हती. आजही नाही. त्या देशाच्या लष्करप्रमुखाची भेट घेण्याचे तर कोणतेही औचित्य नव्हते की प्रयोजनही नव्हते. पण, इम्रानने धाडलेल्या नुसत्या निमंत्रणाने उतावीळ झालेले पंजाबचे मंत्रीच तारतम्य हरवून बसले होते. असल्या प्रसंगी राखणे अपेक्षित असलेल्या गांभीर्याची जाणीवही त्यांच्या चेहर्यावर कुठे झळकत नव्हती. उलटपणी जावेद बाजवा यांची गळाभेट घेतानाचा अनाकलनीय आनंद त्यांच्या चेहर्यावर उमटलेला दिसत होतात्याहीपेक्षा, पाकभेटीनंतर भारतात आल्यानंतर जे अकलेचे तारे त्यांनी तोडलेत, ते अधिक वेदनादायक आणि चीड आणणारे आहेत. या भेटीमुळे दोन देशांमधील संबंध सुधारणार असल्याचा त्यांचा दावा तर तद्दन फालतू, तकलादू अन्हास्यास्पदही आहे, तरीही त्यांनी तो केलाय्खरा!

 

बा, सिद्धू, पंतप्रधानही तर नवाझ शरीफांना भेटले होते, मग मी भेटलो तर काय झालं इथपासून तर... मग भारतातल्या तमाम विदेशी दूतावासांचा उपयोग काय, इथपर्यंतच्या तुझ्या प्रश्नांमधून तुला नेमकं काय सिद्ध करायचंय्ते ठाऊक नाही, पण स्वत:ची चूक उमगल्यावर, लोकांच्या प्रक्षुब्ध भावनांची पुरेशी कल्पना आल्यावर हताश झालेला तू, तुझ्याच त्या प्रश्नांमधून झळकला, हे मात्र खरे! काही लोकांनी ठरवला तसा देशद्रोही तू तांत्रिकदृष्ट्या नसशीलही कदाचित, पण म्हणून तुझ्या त्या कृत्याचे समर्थन मात्र कदापि होऊ शकत नाही. आपले पंतप्रधान, राष्ट्रपती यांच्या भेटीच्या वेळी तिथले जे अधिकारी सलामी द्यायला रांगेत उभे राहतात त्यांना गळाभेटीसाठी पात्र ठरविण्याची किमया भारतीय संसदेचे सदस्य राहिलेल्या नवज्योत सिद्धू यांच्या हातून लीलया घडावी, ही बाब सार्या भारताला आक्षेपार्ह वाटली असेल, तर ती चूक कशी ठरवता येईल? आता दुसर्याच कुणालातरी आरोपीच्या पिंजर्यात उभे करून स्वत:ची सुटका करून घेण्याचा प्रयत्न अन्आपल्याच चुकीच्या वागणुकीचे सिद्धूंनी चालवलेले लटके समर्थन योग्य कसे ठरवता येईल?

 

क्रिकेटचे विश्व सिद्धूंचे स्वत:चे. एकट्याचे. पण, राजकीय वतुर्ळातील त्यांचे अबाधित स्थान निर्माण करण्यासाठीचा भाजपाचा वाटा मोठा राहिला, हे तर खुद्द त्यांनाही नाकारता येणार नाही. त्याच भाजपाचे अर्ध्वर्यू अटलबिहारी वाजपेयी यांच्या निधनाने सारा देश हळहळत असताना, कधीकाळचा त्या पक्षाचा एक पाईक मात्र अटलजींचा अंत्यविधी टाळून आपल्या एका दूरस्थ मित्राच्या शपथविधीला उपस्थित राहणे अधिक पसंत करतो... काहीही म्हण सिद्धू, पण हे काही पटत नाही गड्या मनाला...!

‘‘कहू दोस्तसें दोस्त की बात क्या क्या;

रही दुश्मनोंसें मुलाकात क्या क्या...’’

@@AUTHORINFO_V1@@