श्रद्धेय अटलजींच्या अस्थींचे रामकुंडात विसर्जन

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    25-Aug-2018
Total Views |


 

 

लौटकर आऊंगा, कूच से क्या डरु...

 

नाशिक : भारताचे दिवंगत पंतप्रधान भारतरत्न अटलबिहारी वाजपेयी यांच्या अस्थींचे येथील रामकुंडात विधीपूर्वक विसर्जन करण्यात आले. यावेळी राज्याचे जलसंपदा मंत्री व वैद्यकीय शिक्षण मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री गिरीश महाजन, पशुसंवर्धन मंत्री महादेव जानकर, दिंडोरी लोकसभा मतदार संघाचे खा. हरिश्चंद्र चव्हाण, भाजप शहराध्यक्ष आ. बाळासाहेब सानप, आ. सीमा हिरे, आ. देवयानी फरांदे, आ. राहुल आहेर आदींसह सर्वपक्षीय लोकप्रतिनिधी, भाजपचे पदाधिकारी, कार्यकर्ते, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे पदाधिकारी, स्वयंसेवक आणि कार्यकर्ते उपस्थित होते. अस्थीकलशाची पूजा व त्यांचे पौरोहित्य पुरोहित संघाचे अध्यक्ष सतीष शुक्ल आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी पार पाडले.

 

अस्थिकलशाचे नाशिककरांना दर्शन घेता यावे यासाठी अस्थिकलश दि. २३ रोजी भाजप कार्यालायत दिवसभर ठेवण्यात आला होता. काल सकाळी सर्व मान्यवरांनी पूजन आणि पुष्पांजली अर्पण केल्यानंतर अस्थिकलश यात्रा सकाळी ११ वाजता वसंत स्मृती या भाजप कार्यालयातून भावुक वातावरणात निघाली. याप्रसंगी फुलांनी सजविलेल्या ट्रकमध्ये अटलजींनी प्रतिमा आणि अस्थीकलश ठेवण्यात आलेला होता. वाजपेयी यांना श्रद्धांजली वाहण्यासाठी वारकरी भजनी पथकाने सर्वात पुढे सुश्राव्य भजनाचा ताल धरला होता. यावेळी शहरातील विविध महाविद्यालयांचे विद्यार्थी, सामाजिक, औद्योगिक, शैक्षणिक, सांस्कृतिक अशा विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते.

 

 
 

याप्रसंगी जिल्ह्याचे पालकमंत्री या नात्याने गिरीश महाजन यांच्या हस्ते पूजाविधी संपन्न झाले. त्यानंतर सर्वमान्यवरांच्या हस्ते वाजपेयी यांच्या अस्थिंचे विधीवत विसर्जन करण्यात आले. याप्रसंगी नदीपात्राच्या दोन्ही बाजूस दोरखंड लावून पुष्पकलाशाद्वारे पुष्पवृष्टी करण्यात आली.

 

असा होता अस्थिकलश यात्रेचा मार्ग

 

अण्णाभाऊ साठे चौक (जीपीओ समोर) - डॉ. आंबेडकर चौक (गंजमाळ सिग्नल) - स्व. इंदिरा गांधी चौक (शालीमार) - शिवाजी रोड - संतगाडगे महाराज चौक (मेनरोड) - गो. ह. देशपांडे पथ (मेनरोड) - रविवार कारंजा - अहिल्यादेवी होळकर पूल - मालेगांव स्टॅड - पंचवटी कारंजा - मालविय चौक मार्ग रामकुंड.

@@AUTHORINFO_V1@@