विद्यापीठाच्या नव्या बृहत् आराखड्याला विद्यापीठ पातळीवर मंजुरी

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    25-Aug-2018
Total Views |

अंतिम मंजुरीसाठी शासनाला सादर करणार

 
 
 
 
पुणे : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या २०१९-२० ते २०२३-२४ या पाच वर्षांच्या बृहत आराखड्याला विद्यापीठाकडून शिफारस व मंजुरी देण्यात आली असून, हा आराखडा अंतिम मंजुरीसाठी शासनाकडे (महाराष्ट्र उच्च शिक्षण परिषद) पाठवण्यात आला आहे.
 
विद्यापीठाची व्यवस्थापन परिषद (मॅनेजमेंट काउन्सिल) आणि विद्या परिषदेच्या (अॅकेडमीक कौंन्सिल) बैठका गुरूवारी पार पडल्या. त्यात या बृहत् आराखड्यात मंजुरी देण्यात आली. तो पुढे शासनाकडे पाठवण्यात येणार आहे. विस्तार, समावेशकता, कौशल्यविकास, रोजगारनिर्मिती, नवनिर्मिती, उद्योजकता विकास, समाजोपयोगी-उद्योगोपयोगी संशोधन, गुणवत्ता हे निकष डोळ्यासमोर धरून आराखडा तयार करण्यात आला आहे. त्यासाठी विद्यापीठाचे विविध भागधारक- विद्यार्थी, शिक्षक, प्राचार्य, संस्थाचालक, उद्योगज-व्यापारी, सामाजिक कार्यकर्ते याची मते गृहित धरण्यात आली आहेत. विविध सदस्यांच्या सुचनांनुसार त्यात आवश्यक ते बदलही करण्यात आले आहेत, असी माहिती विद्यापीठाचे प्र-कुलगुरू डॉ. एन. एस. उमराणी यांनी दिली.
 
या बृहत् आराखड्यात असलेल्या ठळक बाबी पुढीलप्रमाणे -
 
⦁ एनआरआरएफ रँकिंगमध्ये सध्या विद्यापीठ नवव्या स्थानावर आहे. ते पाचव्या स्थानावर नेण्याचा प्रयत्न करणार.
 
⦁ विद्यापीठाच्या क्षेत्रात (पुणे, अहमदनगर व नाशिक जिल्हे) ५८ नवी महाविद्यालये सुरू करणार.
 
⦁ संबंधित वयोगटातील (१८ ते २३) लोकसंख्येनुसार असलेला ग्रॉस एनरोलमेंट रेशो ५ टक्क्यांनी वाढवणार. सध्या विद्यापीठाचा सरासरी रेशो ३० टक्के आहे. तो ३५ टक्क्यांवर नेेणार.
 
⦁ या महाविद्यालयांमध्ये आर्ट्स-कॉमर्स-सायन्स, अॅनिमेशन, एव्हिएशन, फॅशन डिझाईन, फाईन आर्ट्स, सोशल वर्क या विषयांचा समावेश आहे.
 
⦁ दिव्यांग व विशेष मुलांसाठी एक महाविद्यालय सुरू करणार.
 
⦁ महिलांसाठी, आदिवासी भागासाठी तसेच, रात्रीच्या वेळीचे (नाईट कॉलेज) असे प्रत्येकी एकेक महाविद्यालय सुरू करणार.
 
⦁ वंचित घटक व ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना फायदा व्हावा म्हणून ५०० महाविद्यालयांमध्ये समानसंधी कक्ष सुरू करणार.
 
⦁ नॅकसाठी पात्र असलेल्या सर्व महाविद्यालयांचे मूल्यमापन व्हावे हे प्रस्तावित आहे. सध्या ८८२ महाविद्यालयांपैकी १९० महाविद्यालयांचे नॅक मूल्यमापन झाले आहे. येत्या ५ वर्षांत ४९० महाविद्यालयांचे नॅक करणार.
 
⦁ २०० महाविद्यालयांसाठी “ए” दर्जा मिळवण्याचे उद्दिष्ट.
 
⦁ येत्या ५ वर्षांत ६० महाविद्यालये अॅटॉनॉमी प्राप्त करणार.
 
⦁ २०२४ सालापर्यंत विद्यापीठाच्या सर्व परीक्षांचे निकाल ३० दिवसांत लावणार.
 
⦁ कमवा व शिका या योजनेचा लाभ सध्या १४ हजार विद्यार्थी घेतात. हा आकडा ५० हजारांवर नेणार.
 
⦁ स्कील डेव्हलपमेंट कोर्सेसची संख्या ३० आहे. ती १०० पर्यंत वाढवणार.
 
⦁ आता असलेल्या सर्वच विद्याशाखांच्या एकूण कोर्सेसपैकी निम्म्याहून अधिक कोर्सेसना सक्तीची इंटर्नशीप करणार.
 
⦁ प्लेसमेंट सेल सध्या ४३९ आहेत. त्यांचा ३५ हजार विद्यार्थ्यांना फायदा होतो. या सेल्सची संख्या ८५० करणार. त्याचा फायदा १ लाख १० हजार विद्यार्थ्यांना होणार.
 
⦁ काउन्सिलिंग व गाईडन्स केंद्रांची संख्या सध्या ४०० आहे. ती दुप्पट म्हणजे ८०० इतकी करणार.
 
⦁ खेळांमध्ये गुणवत्ता वाढवण्यासाठी मूलभूत सोयी-सुविधांबरोबरच (इन्फ्रास्ट्रक्चर) खेळाडूंना विशेष प्रशिक्षण देणार.
 
⦁ दरवर्षी ६८५ विद्यार्थी पीएच.डी. मिळतात. ही संख्या दरवर्षी ९०० इतकी नेणार.
 
⦁ संशोधन आणि विकासासाठी (आर अँड डी) २०० उद्योगांसोबत भागीदारीत काम करणार.
 
⦁ कन्सल्टन्सीच्या माध्यमातून वर्षाला ५ कोटी मिळवणार.
 
⦁ या काळात ५५ पेटेन्ट्सची नोंदणी व्हावी हे उद्दिष्ट.
 
⦁ इनोव्हेशन आणि इन्क्युबेशन हबची १० केंद्र स्थापणार.
 
@@AUTHORINFO_V1@@