पद्मश्री डॉ. विखे पाटील विद्यापीठस्तरीय वक्तृत्व स्पर्धेत अनुष्का जैन प्रथम

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    25-Aug-2018
Total Views |

उत्कर्षा पाटील, पायल घोसाळकर यांनाही यश

 

 
 
 
पुणे : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या पद्मश्री डॉ विखे पाटील अध्यासनाच्या वतीने विखे पाटील यांच्या ११८ व्या जयंती निमित्ताने आयोजित करण्यात आलेल्या विद्यापीठ स्तरीय वक्तृत्व स्पर्धेमध्ये बीएमसीसी महाविद्यालयाची विद्यार्थिनी असलेल्या अनुष्का जैन हिने प्रथम पारितोषिक मिळविले. तर विद्यापीठाच्या वाणिज्य विभागाच्या उत्कर्षा पाटीलला द्वितीय; आणि फर्ग्युसन महाविद्यालयाच्या पायल घोसाळकरला तृतीय क्रमांकाच्या पारितोषिकाने गौरविण्यात आले. वाणिज्य विभागाने आयोजित केलेली ही स्पर्धा नुकतीच संपन्न झाली.
 
या स्पर्धेत पुणे, नाशिक, अहमदनगर या जिल्हातील ६४ महाविद्यालये आणि विद्यापीठातील विविध विभागातून ११० स्पर्धकांनी सहभाग नोंदवून विविध विषयांवर उस्फूर्तपणे सादरीकरण केले. स्पर्धेचे उदघाटन माजी अधिष्ठाता प्रा. डॉ कडवेकर आणि प्राचार्य डॉ संजय चाकणे यांच्या हस्ते झाले. शेतकरी कर्जमाफी – अर्थकारण की राजकारण, डिजीटल इंडिया – नव्या भारताचे स्वप्न, स्टार्टअप आणि स्टॅन्डअप इंडिया योजना– स्वप्न आणि वास्तव, नागरी सहकारी बँकांसमोरील आव्हाने असे या स्पर्धेचे विषय होते. स्पर्धेचे परीक्षण प्रा. डॉ प्रभाकर देसाई, माजी प्राचार्य डॉ कैलास बवले, प्रा डॉ प्रकाश चौधरी, प्रा डॉ सुनील भंडगे, प्राचार्य सोनवणे यांनी केले.
 
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे कुलगुरू प्रा. डॉ. नितीन करमळकर, वाणिज्य विभाग प्रमुख प्रा. डॉ. दत्तात्रय माने, क्रीडा विभागाचे संचालक डॉ. दीपक माने, संख्याशास्त्र विभागाचे प्रा. डॉ. रावसाहेब लटपटे, अध्यासनाचे प्रमुख प्रा. डॉ. मुकुंद तापकीर यांच्या हस्ते बक्षीस वितरण करण्यात आले. स्पर्धा यशस्वीपणे पार पाडण्यासाठी वाणिज्य विभागाच्या प्रा. डॉ. श्यामला, प्रा. वैशाली जगताप व प्रथम वर्षातील विद्यार्थ्यांनी सहकार्य केले. स्पर्धेतील सुजीत म्हेत्रे, रुचिका भांदरे या अन्य दोन स्पर्धकांना उत्तेजनार्थ पारितोषिक मिळाले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक अध्यासन प्रमुख प्रा. डॉ. मुकुंद तापकीर यांनी केले तर कार्यक्रमाचे सूत्रसंचलन सागर रौंदळ यांनी केले.
 
@@AUTHORINFO_V1@@