कायदा विद्यार्थ्यांना मिळाला 'सेवा कायदा' या विषयाच्या माहितीचा लाभ

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    24-Aug-2018
Total Views |
 
 
 
मुंबई : सेवा कायदा या विषयावर माहिती देण्यासाठी अखिल भारतीय अधिवक्ता परिषदेतर्फे व्ही.टी. वालावलकर स्मृती व्यायाख्यानमालेत काल सिडनहेम महाविद्यालयात अॅड. विजय वैद्य यांचे व्याख्यान आयोजित करण्यात आले होते. कामगार आणि सेवा कायद्यात विजय वैद्य तज्ज्ञ आहेत. तसेच यावेळी त्यांनी कायद्याच्या विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.  
 
कार्यक्रमाच्या सुरुवातीला माजी पंतप्रघान स्व. अटल बिहारी वाजपेयी ह्यांनी श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. वकील आणि कायद्याचे विद्यार्थी ह्या कार्यक्रमासाठी मोठ्या संख्येने उपस्थित होते.अॅड. वैद्य ह्यांनी आपल्या व्याख्यानातून सेवा कायद्याची संकल्पना, कामगार कायद्याची उत्पत्ती, भारतातील वेगवेगळे कामगार कायदे, कामगार कायद्यांमधील बारकावे, समस्या अशा विविध विषयांवर प्रकाश टाकला.

व्याख्यानानंतर प्रश्नोत्तराचे सत्रही रंगले. अधिवक्ता परिषदेतर्फे नेहमीच वकिलांसाठी उपयुक्त कार्यक्रम राबवण्यात येत असतात.
 
 
 
 
@@AUTHORINFO_V1@@