ज्येष्ठ मराठी अभिनेते विजय चव्हाण यांचे निधन

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    24-Aug-2018
Total Views |

सतत हसविणाऱ्या चेहऱ्याने आज सर्वांनाच रडविले

 
 
मुंबई : मराठी रंगभूमी आणि सिनेसृष्टी गाजवणाऱ्या, सतत हसवणाऱ्या चेहऱ्याने अखेर आज सगळ्यांना रडविले, दिग्गज अभिनेते विजय चव्हाण यांचे आज निधन झाले. ते ६३ वर्षांचे होते. मुंबई येथील फोर्टीस रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरु होते. प्रदीर्घ आजाराने त्यांचे निधन झाले असल्याचे सांगण्यात येत आहे.
 
 
मोरूची मावशी, श्रीमंत दामोदरपंत ही नाटके त्यांच्यामुळे गाजली. त्यांनी सुमारे ४०० हून अधिक चित्रपटांमध्ये काम केले. 'वहिनीची माया' या चित्रपटाद्वारे त्यांनी चित्रपटसृष्टीत पदार्पण केले. विनोदी भूमिकांमध्ये त्यांनी चोख कामगिरी केली. त्यांना 'व्ही. शांताराम जीवन गौवव पुरस्काराने' सन्मानित करण्यात आले होते.
 
 
 
"मोरूची मावशी अजरामर करणारे श्री विजय चव्हाण ह्यांच्या दुःखद निधनाने एक अष्टपैलू कलाकार आपल्यातून निघून गेला आहे. मराठी चित्रपट, नाटक आणि मालिका या तिन्ही माध्यमांना गेली ४० वर्षे व्यापून टाकणारा अभिनेता महाराष्ट्राच्या कलाविश्वाने गमावला आहे. माझी भावपूर्ण श्रध्दांजली! ओम शांती !" अशा भावना राज्याच्या महिला आणि बालकल्याण मंत्री पंकजा मुंडे यांनी व्यक्त केल्या.
 

तर "मराठी नाटक, चित्रपट, मालिका ही तिन्ही माध्यमे ४० वर्षे आपल्या दमदार अभिनयाने व्यापून टाकणारे अष्टपैलू अभिनेते विजय चव्हाण यांना महाराष्ट्राच्या कलाविश्वाने गमाविले आहे. विनोदाचं उत्तम टायमिंग असलेल्या विजूमामा यांची ही एक्झिट मनाला हळहळ लावणारी आहे. भावपूर्ण श्रद्धांजली!" या शब्दांत राज्याचे शिक्षण आणि सांस्कृतिक मंत्री विनोद तावडे यांनी आपले दु:ख व्यक्त केले.
 
 
 
 
"सतत आनंदी असलेला आणि समोरच्याला सतत आनंदी ठेवणारा आमचा लाडका विजू मामा. एक उत्तम कलाकार आणि माणूस. मामा भावपूर्ण श्रद्धांजली" अशा भावना अभिनेता सुबोध भावे यांनी व्यक्त केल्या आहेत. "माझा एक चांगला मित्र आणि हरहुन्नरी नट हरपला." अशा भावना अशोक सराफ यांनी व्यक्त केल्या आहेत.
 
 
@@AUTHORINFO_V1@@