भुसावळांत भव्य तप महोत्सव

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    24-Aug-2018
Total Views |
 
 

भुसावळांत भव्य तप महोत्सव

भुसावळ, 24 ऑगस्ट
राष्ट्र प्रवर्तीनी डॉ.श्री.ज्ञानप्रभाजी यांच्या सान्निध्यात भव्य तपमहोत्सव भुसावळ शहरात 26 रोजी आयोजित करण्यात आला आहे. याअंतर्गत प्रसिध्द उद्योगपती स्व.शांतीलाल सुराणा यांचे नातू हितेश जंयतीलाल सुराणा याने युवा अवस्थेत तपाचे शिखर गाठल्याने भव्य मिरवणूक काढण्यात येणार आहे.
तप जीवनाचा प्राण आहे. तपामुळे अनेक गोष्टी साध्य होतात. चंंचल मनाला स्थिरता लाभते. धर्म , संस्कृती , राष्ट्र आणि विश्वाचा विकास हा तपावरच आधारीत आहे. भारताची संस्कृती ऋ षी आणि कृषीवर आधारीत आहे. ऋ षी संयम आणि तपाच्या बळावर सर्वशक्ती संपन्न बनून जनतेला संयम, प्रेम, मैत्री, अहिंसेचा संदेश देऊन विश्व बंधूत्वाची भावना जोपासण्याचा प्रयत्न करतात. अहिंसा स्वयंतप ज्यांच्या जीवनात आहे त्यांना स्वर्गाचे देवता सुध्दा नमन करतात.
 
 
 
तप म्हणजे केवळ भूकेला शमन करणे नव्हेत तर आपल्या इंद्रिया नियंत्रित करणे हा तपाचा मुख्य उद्देश आहे. जैन धर्मच एक विशिष्ट कोटीच तप आहे. या उपवासात सुर्योदया नंतर सुर्यास्ता पर्यंत उकळलेले गरम पाणी पिऊ शकतात. आहार संकल्पनेवर मात करुन हे उपवास केले जातात. सुर्यास्ता नंतर पाण्याचा एक थेंबही चालत नाही. याचे मुख्य फळ कर्म निर्जरा आहे.
 
 
भुसावळ शहराचे प्रसिध्द उद्योगपती स्व. शांतीलाल सुराणा यांचे नातु , जयंतीलाल सुराणा यांचे चिरंजीव हितेश यांनी तब्बल 31 दिवसाचे कठोर उपवास केले आहेत. हितेश यांनी युवा अवस्थेत हे कडक तप केले आहे. यासोबत रमेश कोठारी यांच्या सून मंजूबाई अजितकुमार कोठारी यांनी सुध्दा 31 दिवसांचे कठोर उपवास केले आहेत.
या चातुर्मासात या साधकांना 9 साध्वींचे मार्गदर्शन तथा सतप्रेरणा मिळाली. साध्वींच्या संतसंगाने अनेकांनी 31,15,11,09 असे उपवास करुन चातुर्मासात खूप रंग जमविला आहे. संमकित नितीनकुमार सुराणा याने सुध्दा व्यस्तेत असुन सुध्दा १५ दिवसांचे उपवास केले. उपवासांची सांगता रविवार 26 रोजी होणार असून तपस्वींची अष्टभूजा मंदिरापासून संतोषी माता सभागृहा पर्यंत मिरवणूक काढण्यात येणार आहे. या कार्यक्रमात प्रमुख अतिथी म्हणून सुधीर कोचर, भोपाळ , आ. संजय सावकारे, आ.हरिभाऊ जावळे, आ.सुरेश भोळे, आ. चंदुभाई पटेल व इ. सर्व समाजबांधव उपस्थित राहणार आहेत.
 
@@AUTHORINFO_V1@@