शासनाच्या विविध योजनांच्या अंमलबजावणीसाठी तहसीलदाराचे योगदान महत्त्वाचे : आ. खडसे

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    24-Aug-2018
Total Views |

रावेरला शासनाच्या विविध योजनांचे अनुदान वाटप

 
रावेर :
विविध शासनाच्या योजना सर्वसाधारण जनतेपर्यंत पोहोचविण्यात तहसीलदाराचे योगदान महत्त्वपूर्ण असून जिल्ह्यात त्यांना संजय गांधी निराधारची टीमही मदत करीत आहे. त्या माध्यमातून एवढ्या मोठ्या प्रमाणात अनुदानाचे धनादेश गरजूंपर्यंत पोहोचत असल्याचे प्रतिपादन माजी महसूलमंत्री एकनाथराव खडसे यांनी केले.
 
 
तहसील कार्यालयात अर्थ सहाय्यक योजनेअंतर्गत विविध धनादेशाचे वाटप गुरुवारी आ. एकनाथराव खडसे यांच्या उपस्थितीत लाभार्थ्यांना देण्यात आले. यावेळी ते बोलत होते. यावेळी खासदार रक्षाताई खडसे, आ. हरिभाऊ जावळे, जिल्हा परिषद उपाध्यक्ष नंदकिशोर महाजन, पंचायत समिती सभापती माधुरी नेमाडे उद्योजक श्रीराम पाटील, उपसभापती अनिता चौधरी, माजी शिक्षण सभापती सुरेश धनके, जि.प.सदस्य रंजना पाटील, कैलास सरोदे, पं. स. सदस्य कविता कोळी, पी.के. महाजन, जितू पाटील, संजय गांधी निराधारचे अध्यक्ष शिवाजीराव पाटील, भाजपा युवामोर्चा जिल्हाध्यक्ष अमोल पाटील, भाजपा जिल्हा उपाध्यक्ष पद्माकर महाजन, भाजपा तालुकाध्यक्ष सुनील पाटील, नगरसेवक यशवंत दलाल, शारदा चौधरी, भाजपा सरचिटणीस महेश चौधरी, वासू नरवाडे, उमेश महाजन गोपाळ नेमाडे, रवींद्र महाजन वनक्षेत्रपाल आर.जी. राणे, प्रभारी गटविकास अधिकारी हबीब तडवी आदी उपस्थित होते. प्रास्ताविक तहसीलदार विजयकुमार ढगे यांनी केले.
 
 
विविध योजनेतून अर्थसहाय्य
तालुक्यातील ४३ विधवा महिलांना २० हजार रुपयाचे धनादेश वाटप करण्यात आली तसेच जातीचे दाखले, नवीन रंगीत मतदान ओळखत्रे वन विभागा कडून मोफत गॅस कनेक्शन देण्यात आले.
 
@@AUTHORINFO_V1@@