गाळेधारक ना.महाजनांना भेटणार भाजपच्या कारभारामुळे अपेक्षा वाढली

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    24-Aug-2018
Total Views |
  
 
जळगाव :
महापालिकेतील सत्ता मिळविल्यानंतर भाजपाने वेगवान हालचाली करीत शहराच्या विकासासाठी १०० कोटी रुपये आणले. यामुळे अपेक्षा वाढलेले गाळेधारक पुढील आठवड्यात ना. गिरीश महाजन यांची भेट घेण्याची शक्यता आहे, अशी माहिती सूत्रांनी दिली.
 
 
महापालिका मार्केटमधील दोन हजारांहून अधिक गाळ्यांच्या भाडेकरार नूतनीकरणाचा प्रश्‍न जटील झाला आहे. भाजपाने हा प्रश्‍न सोडविण्याचे आश्‍वासन महापालिका निवडणुकीपूर्वी गाळेधारकांना दिले होते. महापालिकेत ३० ते ३५ वर्षे एकाच व्यक्तीची असलेली सत्ता उलथावून टाकत भाजपा सत्तारूढ झाला.
 
 
या निकालाला अद्याप एक महिनाही पूर्ण झाला नाही मात्र, अतिशय वेगवान हालचाली करीत भाजपाने १०० कोटी रुपये शहराच्या विकासासाठी आणले आहेत. यामुळे आता गाळेधारकांच्या अपेक्षा वाढल्या आहेत. आपला प्रश्‍न कधी सुटणार? या विचाराने ते अस्वस्थ झाले आहेत.
 
 
गाळेधारकांच्या हिताच्या दृष्टीने महापालिका अधिनियमात बदल करण्यात आला पण तो जळगावसाठी लागू होणार की नाही, त्याच्या नियमांची चौकट काय असेल? याची गाळेधारकांना प्रतीक्षा आहे. याचसंदर्भात ते पुढील आठवड्यात ना. गिरीश महाजन यांची भेट घेणार आहेत, अशी माहिती सूत्रांनी दिली.
 
 
डॉ. शांताराम सोनवणे यांच्या नावासाठी आग्रह
गाळेधारक संघटनेने महापालिकेत गाळेधारकांचा प्रतिनिधी असावा, अशी मागणी केली आहे. स्वीकृत नगरसेवकपदी या प्रतिनिधीची वर्णी लागू शकते. त्यासाठी गाळेधारक संघटनेचे अध्यक्ष डॉ. शांताराम सोनवणे यांच्या नावासाठी अनेकांचा आग्रह आहे. डॉ. सोनवणे यांनी गाळेधारकांच्या तीन दिवसीय आंदोलनाचे यशस्वी नेतृत्त्व केले आहे. ते महापालिका सभागृहात गाळेप्रश्‍न अधिक प्रभावीपणे मांडू शकतात. विशेष म्हणजे त्यांना विरोध करण्याचे धारिष्ट्य कुणी दाखविणार नाही. त्यामुळे त्यांनाच संधी मिळायला हवी, असाही एक मतप्रवाह आहे. परंतु संघटनेत कोणतेही निर्णय हे सर्व सहमतीने घेतले जातात. त्यामुळे गाळेधारकांचा प्रतिनिधी कोण असेल? हे आताच सांगता येणार नाही, अशी माहितीही सूत्रांनी दिली.
@@AUTHORINFO_V1@@