शानभाग, डॉ.अविनाश आचार्य विद्यालयात रंगला ‘बाहुल्यांचे विश्व’ कार्यक्रम

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    24-Aug-2018
Total Views |
 
जळगाव :
विवेकानंद प्रतिष्ठान संचालित कै.श्रीमती ब. गो. शानभाग विद्यालय येथे गुरुवारी बाहुल्यांचे विश्व हा कळसूत्री बाहुल्यांच्या कार्यक्रम झाला. आंतरराष्ट्रीय स्तरावर पोलंड येथे ‘वर्ल्ड पपेट कार्निवल २०१६’ मध्ये भारताचे प्रतिनिधित्व करणारे आणि महात्मा गांधी शिक्षण मंडळ येथे कलाशिक्षक म्हणून कार्यरत असलेले दिनेश साळुंखे यांनी सादरीकरण केले.
 
 
व्यासपीठावर विद्यालयाच्या मुख्याध्यापिका अंजली महाजन, उपमुख्याध्यापक जयंतराव टेंभरे, निवासी विभाग प्रमुख शशिकांत पाटील व विभाग प्रमुख राजेंद्र पाटील, जगदीश चौधरी उपस्थिती होते. सुरुवातीला मान्यवरांच्या हस्ते सरस्वती मातेचे प्रतिमा पूजन करण्यात आले.
 
 
दिनेश साळुंखे यांनी विद्यार्थ्यांना कळसूत्री बाहुल्या कशा बनविल्या जातात, त्यांचे प्रकार आणि त्यांचा उपयोग करण्याची पद्धती याचे प्रात्यक्षिकासह मार्गदर्शन केले. यानंतर बाहुल्यांच्या माध्यमातून पाणी वाचवा या सामाजिक समस्येचे सादरीकरण केले. त्याचप्रमाणे विद्यार्थ्यांचे मनोरंजन करताना त्यांनी ‘हुंडा नको मामा’, ‘आता माझी सटकली’, ‘चार चार पगडीवाली गाडी लै जाऊ’ यासारख्या अनेक गीतांवर बाहुल्यांची नृत्ये सादर केली. या कार्यक्रमाचा इयत्ता ५ वी ते १० वीच्या विद्यार्थ्यांनी आनंद घेतला. सूत्रसंचालन सकाळ सत्रात रुपाली सुर्वे तर दुपार विभागात मनोज पाटील यांनी केले. आभार दीपिका चौधरी व रवींद्र पाटील यांनी मानले.
 
 
डॉ.आचार्य विद्यालय
डॉ. अविनाश आचार्य विद्यालयात पपेट शोचे आयोजन विद्यार्थ्यांसाठी करण्यात आले होते. यावेळी पपेट शोचे सूत्रधार दिनेश साळुंखे तसेच मुख्याध्यापिका योगिता शिंपी, समन्वयिका जयश्री वंडोळे उपस्थित होते. या माध्यमातून विद्यार्थ्यांचे मनोरंजन झाले व त्यांना बाहुल्यांचे विविध प्रकारांची माहिती मिळाली तसेच चेंडू व रुमालापासून बाहुली कशी तयार करतात, याचे प्रात्यक्षिक दिनेश साळुंखे यांनी अगदी सोप्या भाषेत मुलांना करून दाखवले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन सचिन गायकवाड यांनी केले.
@@AUTHORINFO_V1@@