जगभरातील साहित्यिकांची ‘पेन इंटरनॅशनल काँग्रेस’ २५ ते २९ सप्टेंबर दरम्यान पुण्यात भरणार

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    24-Aug-2018
Total Views |

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ इंटेलेक्च्युअल पार्टनर

 
 
 
 
 
पुणे : जगभरातील लेखक, संपादक, साहित्यिक यांची प्रतिष्ठित संघटना असलेल्या ‘पेन इंटरनॅशनल’चे वार्षिक अधिवेशन ‘पेन इंटरनॅशनल काँगेस’ हे या वर्षी पहिल्यांदाच भारतात भरणार आहे. हे अधिवेशन भरवण्याची संधी पुण्याला मिळाली असून, २५ ते २९ सप्टेंबर २०१८ या कालावधीमध्ये ते होणार आहे. ‘पेन इंटरनॅशनल काँगेस’साठी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ हे 'इंटेलेक्च्युअल पार्टनर' असेल.
 
आंतरराष्ट्रीय दर्जाचे भाषातज्ज्ञ आणि या परिषदेचे मुख्य समन्वयक डॉ. गणेश देवी आणि सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे कुलगुरू प्रो. (डॉ.) नितीन करमळकर यांनी पत्रकार परिषदेत ही माहिती दिली.
 
‘पेन’ची स्थापना १९२१ मध्ये लंडन येथे झाली. ही संघटना मुख्यत: अभिव्यक्ती स्वातंत्र्य, शांतता आणि मित्रत्व या मूल्यांसाठी कार्यरत असते. शंभराहून अधिक देशांमधील लेखक - साहित्यिक या संघटनेचे सदस्य आहेत. या संघटनेचे अधिवेशन यापूर्वी कधीही भारतात झालेले नाही. महात्मा गांधी यांच्या जन्माचे १५० वे वर्ष ऑक्टोबर २०१८ ते सप्टेंबर २०१९ या काळात साजरे केले जाणार आहे. याचे औचित्य साधून या परिषदेच्या अधिवेशनाचे यजमानपद या वर्षी भारताला मिळाले आहे. ती पुण्यात होत आहे. ही ८४ वी पेन इंटरनॅशनल काँग्रेस असेल.
 
या अधिवेशनादरम्यान विविध कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहेत. त्यामध्ये सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ प्रामुख्याने सहभागी असणार आहे. तसेच, पुण्यातील विविध शैक्षणिक संस्थांनाही सहभागी करून घेण्यात आले आहे. यानिमित्त प्रामुख्याने तीन कार्यक्रम होणार आहेत -
 
१. विद्यापीठाच्या आंतरराष्ट्रीय केंद्रात भाषा वन साकारण्यात येणार आहे. त्यामध्ये जगभरातील विविध भाषांमधील दिग्गज साहित्यिकांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात येणार आहे.
 
 
२. जगातील तसेच भारतातील साहित्यिकांचा विविध २५ महाविद्यालये व शैक्षणिक संस्थांमध्ये संवादाचा कार्यक्रम होणार आहेत. त्यातून साहित्य व भाषाविषयक देवाण-घेवाण अपेक्षित आहे.
 
 
३. यानिमित्त जगातील हजरो भाषांचे प्रतिनिधित्व असलेली भाषादिंडी निघणार आहे.
 
 
या उपक्रमांच्या नियोजनासाठी स्थानिक स्वागत समिती स्थापन करण्यात आली असून, तिचे अध्यक्ष श्री. सचिन इटकर असतील.
 
@@AUTHORINFO_V1@@