राणीच्या बागेतील पेंग्विन पिल्लाचा मृत्यू

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    24-Aug-2018
Total Views |



 

 

मुंबई : राणीच्या बागेतील हंबोल्ट जातीच्याफ्लिपरया पेंग्विन मादीने १५ ऑगस्ट रोजी पहिल्या पिल्लाला जन्म दिला होता. परंतु जन्मानंतर अवघ्या आठव्या दिवशीच या पिल्लाचा यकृतातील बिघाडामुळे मृत्यू झाला आहे. बुधवारी सकाळपासूनच या पिल्लाची प्रकृती ढासळण्यास सुरुवात झाली आणि त्याच दिवशी हे पिल्लू मृतावस्थेत आढळून आले.
 

१५ ऑगस्ट रोजी जन्माला आलेल्या या पिल्लाची प्रकृती अचानक बिघडल्याने पशुवैद्यांच्या पथकाला बोलावण्यात आले. त्यांनी भारतात जन्मलेल्या या पहिल्या पेंग्विन पिल्लाचा जीव वाचवण्यासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा केली. परंतु त्यांच्या प्रयत्नांना यश आले नाही. मुंबई पशुवैद्यकीय महाविद्यालयातील पॅथॉलॉजी, मायक्रोबायोलॉजी आणि पक्षीतज्ज्ञ विभागातील प्राध्यापकांच्या पथकाने २३ तारखेला सकाळी .३० वाजता प्राणिसंग्रहालय रुग्णालयामध्ये शवविच्छेदन केले. यामध्ये नवजात पिल्लातील विसंगती आणि यकृतातील बिघाडामुळे मृत्यू झाल्याचे निरीक्षण नोंदविण्यात आले आहे.

 

भारतात पहिल्यांदा हंबोल्ट पेंग्विनचा जन्म झाला होता. राणीच्या बागेतील मादी फ्लिपर आणि मोल्ट ही जोडी सोबत राहत होती. जुलैला मादी फ्लिपरने अंडे दिले होते. त्यातून पिल्लाचा जन्म झाला. जुलैला अंडे दिल्यानंतर फ्लिपर आणि मोल्ट दोघेही अंड्याला ऊब देत होते. यामध्ये फ्लिपरने सर्वात जास्त पाच दिवस खातापिता अंड्याला ऊब दिली. १५ ऑगस्ट रोजी पिल्लू जन्मले होते. पहिलीच घटना असल्याने प्राणिसंग्रहालयातील डॉक्टर सातत्याने विदेशातील तज्ज्ञांचे मार्गदर्शन घेत होते. परंतु २२ जुलै रोजी त्या पिल्लाची प्रकृती अचानक ढासळली आणि त्या पिल्लाचा मृत्यू झाला.

 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/

@@AUTHORINFO_V1@@