मुरबाड माळशेज घाट सोमवार पर्यंत बंद राहणार!

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    24-Aug-2018
Total Views |


 

 

मुरबाड : कल्याण / मुरबाड या राष्ट्रीय महामार्गावर असलेल्या मुरबाड माळशेज घाटात गेल्या मंगळवारी पहाटे अडीच च्या सुमारास मोठी दरड कोसळून या घटनेत टेम्पो चालक गंभीर जखमी झाला होता. तसेच मंगळावर ते आज शुक्रवार पर्यंत जवळपास ५० तास उलटून गेले तरी अजूनही मुरबाड माळशेज घाट बंद आहे. त्यामुळे घाट मार्गे जाणाऱ्या व येणाऱ्या प्रवाशांचे प्रचंड हाल होत आहे. तसेच मुरबाड बस आगारातून १२ शेडूल बंद करण्यात आले आहेत. तसेच कल्याण बस आगारातून सुद्धा २० शेडूल बंद करण्यात आले आहेत. त्यामुळे दोन्हीं आगारचा एकूण २५ ते ३० लाख रुपयाचा नुकसान झाल्याची माहिती दोन्हीं आगर प्रमुखांनी दिली आहे.
 

सदर माळशेज घाटात राष्ट्रीय महामार्ग बांधकाम खात्यातर्फे ४ जेसीबी मशीन लावून घाटातील पडलेल्या दगडी उचलण्याचे काम युद्ध पातळीवर सुरु आहे. परंतु घाटात धुक्याचे प्रमाण जास्त असल्याने तसेच वरून मोठ-मोठे दगड अजूनही पडतात. तसेच संततधार पावसाचे प्रमाण कायम आहे. या तिन्ही गोष्टीमुळे घाटात काम करण्यास अडथळा निर्माण होत आहे.त्यामुळे अजूनही ३-४ दिवस घाट बंद राहील अशीं शक्यता राष्ट्रीय महामार्ग मुरबाड उपअभियंता सुनील पाटील यांनी दिली. तसेच घाट बंद असल्यामुळे नगर,आळेफाटा, मंचर, जुन्नर येथून येणार भाजीपाला थांबल्याने टोकावडे ते कल्याण दरम्यान भाजीपाल्याचे भाव कडाडले आहेत. अशी माहिती भाजीपाला व्यापाऱ्याने दिली आहे. तसेच मुरबाड, टोकवाडे पोलीसठाण्या मार्फत शनिवार व रविवार पर्यटकांना पूर्ण घाट बंदी केली आहे. अशी माहिती मुरबाड पोलीसठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अजय वसावे व टोकावडे पोलीसठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक धनंजय पोरे यांनी दिली आहे. या घटनेची माहिती घेण्यासाठी कल्याण प्रांत अधिकारी प्रसाद उकिरडे व मुरबाड तहसीलदार सचिन चौधर यांनी घटनास्थळी जाऊन संपूर्ण घाटाची पाहणी केली. व त्यावर मुरबाड तहसीलदार कार्यालयाचे नियंत्रण असल्याचे दिसून येत आहे. मंगळवार ते शुक्रवार पर्यंत कल्याण प्रांतअधिकारी यांच्या नेतृत्वाखाली सचिन चौधर यांनी माहिती घेतली आहे. व त्यांनी सांगितले अजूनही ३ ते ४ दिवस घाट बंद राहील अशी माहिती दिली आहे. परंतु या घाट बंदीमुळे छोट्या छोट्या व्यवसायिकांवर परिणाम झाला आहे.तसेच घाट बंदीमुळे गेल्या २ आठवडाभरापासून हजारो पर्यटकांच्या पदरी निराशा आल्याने काही पर्यटकांनी जवळच्या छोट्या छोट्या धबधब्यावर जाणे पसंत केले आहे. परंतु हिरव्या शालूने नटलेल्या माळशेज घाटाची परंपरा हि वेगळीच आहे अशी प्रतिक्रिया पर्यटकांनी व्यक्त केली आहे.

 
 
 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/

 
@@AUTHORINFO_V1@@