महापौर निवड १९ सप्टेंबरला

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    24-Aug-2018
Total Views |
 
 
जळगाव :
महापौर निवडीसाठी १९ सप्टेंबर रोजी विशेष महासभा होणार असून, विभागीय आयुक्तांकडून पत्र आल्याची माहिती मनपा आयुक्त चंद्रकांत डांगे यांनी दिली. सविस्तर कार्यक्रम दोन दिवसात महापालिकेला मिळण्याची शक्यता आहे. महानगरपालिकेत सन २०१३ मध्ये निवडून आलेल्या सदस्यांचा कार्यकाळ १८ सप्टेंबर रोजी संपत आहे. यानंतर १९ रोजी नूतन महापौरांची निवड केली जाणार आहे. निवडणुकीत ७५ पैकी ५७ जागा भाजपाला मिळाल्या आहेत. ओबीसी महिला गटासाठी महापौरपद राखीव आहे. भाजपामधून या पदासाठी चार ते पाच नगरसेविकांची नावे चर्चेत आहेत पण अद्याप कुणाचेही नाव अंतिम झालेले नाही. जलसंपदामंत्री गिरीश महाजन यांच्या प्रमुख उपस्थितीत पदाधिकार्‍यांची बैठक होईल. त्यात पक्षाकडून महापौरपदाचा उमेदवार निश्‍चित केला जाईल. १२ सप्टेंबर रोजी उमेदवाराचे नाव जाहीर होण्याची शक्यता आहे.
@@AUTHORINFO_V1@@