कोल्हापूरप्रमाणेच जळगावातही नगरसेवकांना बसू शकतो धक्का

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    24-Aug-2018
Total Views |

गणेश सोनवणे यांची औरंगाबाद खंडपीठात याचिका

जळगाव :
कोल्हापूर महापालिकेतील नगरसेवकांनी विहित मुदतीत जातवैधता प्रमाणपत्र सादर न केल्याने त्यांचे पद रद्द करण्याचा ऐतिहासिक निकाल सर्वोच्च न्यायालयाने दिला आहे. दरम्यान, जळगाव महापालिका निवडणुकीत हे प्रमाणपत्र सादर न केलेल्यांचे पद भविष्यात धोक्यात येऊ शकते. सुमारे पाच ते सहा नगरसेवक यात असू शकतात, अशी माहिती प्रभारी महापौर गणेश सोनवणे यांनी दिली.
 
 
महापालिका निवडणुकीत आरक्षित जागांसाठी जातपडताळणीला सहा महिन्यांची मुदत देण्याच्या आदेशाविरोधात गणेश सोनवणे यांनी औरंगाबाद खंडपीठात याचिका दाखल केली आहे. या प्रकरणी राज्याचे ऍडव्होकेट जनरल यांना न्यायासनासमोर हजर होण्याचे आदेश झाले आहेत. जातवैधता प्रमाणपत्राचा कायदा सन २००० मध्ये आला आहे. राज्य सरकार मात्र मनमानी पध्दतीने आदेश काढून हे प्रमाणपत्र सादर करण्यास मुदतवाढ देत असते. हा प्रकार नियमबाह्य असल्याचे सांगून गणेश सोनवणे म्हणाले की, शासनाच्या आदेशाचा लाभ घेत अनेक हौशे-नौशे यांनी जळगाव महापालिका निवडणुकीत अर्ज दाखल केले. काहींनी तर २००८ व २०१३ मध्ये जात पडताळणीसाठी दाखल केलेल्या प्रकरणांच्या चक्क पावत्या जोडल्या आहेत. ते या पावत्यांच्या आधारे निवडणूक जिंकत आले आहेत. कोर्टाने सन १९९४ मध्ये याचिकाकर्त्याला जात प्रमाणपत्र द्यावे, असा निकाल दिला होता. एकाने त्याची प्रत जोडून अर्ज दाखल केला होता. हे प्रकार हास्यास्पद आहेत. माहिती अधिकारात माहिती मागविली आहे. त्यातून इतरही गंभीर बाबी उघडकीस येतील. पण येत्या सहा महिन्यात जातवैधता प्रमाणपत्र सादर न केलेल्यांचे पद भविष्यात धोक्यात येऊ शकते. सुमारे पाच ते सहा नगरसेवक यात असू शकतात, अशी माहितीही सोनवणे यांनी दिली.
 
कोल्हापूर महापालिकेत २० नगरसेवकांचे पद रद्द
कोल्हापूर ः महापालिकेतील कॉंग्रेस आणि राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या २० नगरसेवकांनी विहित मुदतीत जात पडताळणी प्रमाणपत्र सादर न केल्याने सर्वोच्च न्यायालयाने त्यांचे पद रद्द केले आहे. त्यामुळे महापालिकेत खळबळ उडाली आहे.
@@AUTHORINFO_V1@@