आरक्षणासाठी आता कुणबी सेना ही रिंगनात

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    24-Aug-2018
Total Views |


 

पहिल्या राज्यव्यापी कुणबी आरक्षण परिषदेतुन केली कुणबी अरक्षणाची मागणी

शहापुर : महाराष्ट्रात मराठ्यांसह धनगर,मातंग व इतर समाजाने अरक्षणाचा मुद्दा रेटुन धरल्याने गेल्या काही महिन्यांनपासुन राज्यभरात अरक्षणाचा मुद्दा ऐरणीवर आला आहे. शहापुर तालुक्यात कुणबी सेनेने पहिले कुणबी राज्यव्यापी अंदोलन घेवुन अरक्षण व अरक्षणाच्या अंमलबजावनीसाठी राज्यशासना विरोधात एल्गार पुकारला आसल्याने मराठा धनगर अरक्षणा बरोबरच कुणबी समाज ही या लढ्यात उतरल्याने शासनाच्या अडचणीत वाढ झाल्याच चित्र दिसत आहे.

 

आज शहापुर तालुक्यातील शेटे हाँल येथे कुणबी सेने तर्फे विश्वनाथ पाटील यांच्या नेत्रुत्वाखाली पहिल्या राज्यव्यापी कुणबी आरक्षण परिषदेचे आयोजन केले होते. या परिषदेसाठी ठाणे,पालघर,कोकण,खान्देश येथील सर्वपक्षीय नेते एकवटले होते. यावेळी कुणबी समाजातील अनेक नेत्यांनी अरक्षणाबाबत भुमिका मांडुन विचारमंथन केले. शहापुर तालुक्यात बिगर आदिवासी समाज ६५ % आसतांनाही पेसा क्षेत्र घोषीत झाल्यामुळे येथिल बिगर आदिवासिंच्या नोक-या मोठ्या प्रमाणात गेल्या असल्याने बिगर आदिवासि बरेबर कुणबी समाजाचे ही नुकसान झाले आहे,आशी खंत बिगर आदिवासि हक्क समितीचे काशिनाथ तिवरे यांनी मांडली तर आनेक प्रकल्पासाठी शहापुर तालुक्यातील शेकडो एकर जमिनी बाधित झाल्याने इथला भुमिपुत्र मोठ्या प्रमाणावर भुमिहिन झाला आहे तसेच रोजगाराच्या इतर संधी नसल्यामुळे नाईलाजाने का होईना पण कुणबी समाजातील तरुण खेडी सोडुन शहराकडे मोठ्या प्रमाणावर स्थलांतरीत होत आहे.त्यामुळे कुणबी समाज शेती बरोबर नोकरीतुन ही बेदखल होत आहे. तसेच घटनेने दिलेल्या आरक्षणाची अंमलबजावनी होत नसल्याने कुणबी सेनेने पुढाकार घेवुन ह्या राज्यव्यापी कुणबी आरक्षण परिषद घेतली. या परिषदेत कुणबी सेना प्रमुख विश्वनाथ पाटील यांनी आपल्या धारधार वकृत्वाने अनेक विषयांवर तुफान फटके बाजी करत ही लढाई आपल्या राजकिय कारकिर्दीतील शेवटी लढाई आसल्याचे जाहिर केले.

 

या परिषदेत मंडल आयोगाच्या शिफारशी नुसार ओबिसींना मिळालेले २७% अरक्षण महाराष्ट्रात लागु करावे, ओबिसी अरक्षणात घटनेत तरतुद आसल्याप्रमाने कुणबी समाजाला संख्येनुसार ४५% स्वतंत्र अरक्षण द्यावे, पेसा क्षेत्रात ३ व ४ श्रेणीत १०० % नोकरीतील अरक्षणात कुणबी समाजाला संख्येनुसार ३५% अरक्षण द्यावे.सन २००० पुर्वी आसलेली महाराष्ट्रातील ३ व ४ श्रेणीतील नोकरीतील जिल्हाबंदी लावुन १००% स्थानीकांना नोकर्यांत प्राधान्य द्यावे,पेजे आर्थिक विकास महामंडळाला स्वतंत्र ५०० कोटीची तरतुद करुन व व्यावसाईक कर्ज उपलब्ध करुन द्यावे, इत्यादि मागण्या करण्यात आल्या, या परिषदेसाठी कुणबी सेना प्रमुख विश्वनाथ पाटील, राजाभाऊ कातकर, माजी आमदार दिगंबर विशे,राष्ट्रवादिचे दशरथ तिवरे युवराज पाटील, शरद पाटील, पराग पष्टे,काशिनाथ तिवरे , रवि चंदे,रवि पाटील, प्रकाश भांगरथ, विद्याताई वेखंडे, हरीभाऊ खाडे,बबन हरणे,अपर्णा खाडे, इत्यादि मान्यवर उपस्थित होते.

 
 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/

 
 
@@AUTHORINFO_V1@@