भुसावळात खेडी रोडवर उघडयावर मांस टाकलेरोगराई पसरण्याचा धोका

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    24-Aug-2018
Total Views |
 
 
 
भुसावळात खेडी रोडवर उघडयावर मांस टाकले
रोगराई पसरण्याचा धोका
भुसावळ, 24 ऑगस्ट
शहरात खेडी रोडवर असलेल्या कचरा डंपींग मैदानावर मोठया प्रमाणात मांस टाकण्यात आल्याने या रस्त्यावरुन ये-जा करणा-या नागरिकांचे व परिसरातील नागरिकांचे आरोग्य धोक्यात आल्याने दोषींवर कारवाई करण्यासाठी बाजारपेठ पो.स्टे.च्या निरिक्षकांना निवेदन देण्यात आले आहे.
 
बकरी ईद नंतर मोठया प्रमाणात मांस येथे फेकण्यात येते. हा रस्ता वर्दळीचा असल्याने रस्त्याने ये-जा करणा-या ग्रामस्थांचे आरोग्य धोक्यात आले आहे. राज्यात गोवंश हत्या बंदी कायदा असून त्याचे काटेकोरपणे पालन होत नाही.गोवंश हत्त्या मोठया प्रमाणात होत आहेत. गोवंश हत्त्या करणा-या गुन्हेगारांना कडक शिक्षा करावी. शहरात गोवंश हत्त्या करणा-या कत्तल खान्यांवर गुन्हे नोंदवून त्यांच्या मालकांवर कारवाई करण्यासाठी बाजारपेठ पोलीस ठाण्याचे पो.नि.सरोदे यांना ग्रामस्थ तसेच युवकांनी निवेदन दिले आहे.
चौकट
नंदूरबार येथे नगर पालिकेच्या कचरा डेपोवर मोठया प्रमाणात मांस फेकण्यात आल्याने पालिकेचे मुख्याधिकारी , आरोग्य अधिकारी तसेच अन्य काही व्यक्तीं विरुध्द गुन्हा नोंद करण्यात आला आहे. त्या अनुषंगाने भुसावळ बाजारपेठ पोलीस ठाण्याचे पोलीस अधिकारी कोणती कारवाई करतात याकडे शहरवासीयांचे लक्ष लागून आहे.
@@AUTHORINFO_V1@@