स्टार्ट अपद्वारे रोजगार वाढविण्याचा सरकारचा प्रयत्न

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    24-Aug-2018
Total Views |

विदेशी गुंतवणुकदारांनाही संधी मिळणार, पण नियंत्रण प्रवर्तकांकडेच राहणार.
रक्षाबंधनाच्या पार्श्‍वभूमिवर बाजार ‘सोन्याच्या मिठाई’चा भरला!

 
 
स्मार्ट फोनचा स्क्रीन टॉयलेटपेक्षा तीन पट अस्वच्छ!
पेमेंट सर्विसला देशात मान्यता मिळण्यासाठी व्हॉट्स ऍपचे प्रयत्न
सरकार आता स्टार्ट अपच्या द्वारे रोजगार वाढविण्याच्या प्रयत्नात गुंतले आहे. यादृष्टिने सरकार लवकर च नवे धोरण आणणार असून त्यानुसार बराचसा हिस्सा विकल्या नंतरही स्टार्ट अपच्या प्रवर्तकांना आपले नियंत्रण गमावण्याचा धोका राहणार नाही. तसेच विदेशी गुंतवणुकी(एफडीआयलाही वाव राहणार असून त्यासाठी डेट व इक्विटी सारखी गुंतवणुकीची यंत्रणा उपलब्ध करुन दिली जाणार आहे. या यंत्रणेद्वारे एफडीआयमध्ये सवलती दिल्या जातील.
या नव्या व्यवस्थेमुळे कंपनीवर विदेशी गुंतवणुकदारांचे मर्यादित तर प्रमोटर्सचे पूर्ण नियंत्रण राहणार आहे. या धोरणामुळे व्हेंचर कॅपिटल फर्मला ही लाभ होणार आहे. उपरोक्त डेट व इक्विटीमध्ये ठराविक वेळेपर्यंत गुंतवणूक करणे आवश्यक राहणार आहे. यावर अंतिम निर्णय अर्थमंत्रालयाच्या इतर संबंधित मंत्रालयांशी होणार्‍या बैठकीत घेण्यात येईल. अंतिम प्रस्ताव केंद्रीय मंत्रिमंडळाकडे पाठविण्यात येणार आहे. त्यानंतर नवे धोरण अंमलात येईल.
 
 
रक्षाबंधनाच्या पार्श्‍वभूमिवर ‘सोन्याच्या मिठाई’चा बाजार सध्या भरलेला आहे! हिर्‍यांची नगरी (डायमंड सिटी) म्हणून प्रसिद्ध असलेल्या सुरतमध्ये ही सोन्याची मिठाई विक्रीसाठी आलेली आहे. या अभिनव मिठाईत स्वादिष्ट सुकामेवा (ड्रायफ्रूट) व त्याभोवती २४ कॅरेट सोन्याचा वर्ख लपेटलेला आहे. त्यापेक्षाही चमकदार आहे ती या मिठाईची अवघी ९हजार रुपये किलो किंमत! दुकानदारांच्या दाव्यानुसार यात सर्वोत्कृष्ट दर्जाच्या सुक्या मेव्याचा वापर करण्यात आलेला आहे. तसेच सोन्याचा वर्ख आरोग्यासाठीही उत्तम आहे. पण ही मिठाई शिळी होण्याच्या आत ती खरेदी करावी लागणार आहे. नाहीतर तिची चवच उरणार नाही. त्यामुळे ही मिठाई ज्याला हवी आहे त्याला त्वरित बुकिंग करावे लागणार आहे.
 
 
रक्षाबंधनासाठी मोठ्या प्रमाणावर मिठाई खरेदी केली जात असून ती महाग किंवा स्वस्त असे पाहिले जात नसल्याने याच वेळी सोन्याच्या मिठार्ईची निवड दुकानदारांनी केली आहे. आता एका किलोसाठी नऊ हजार रुपये कोण मोजणार? तसे पाहिले तर सुरत हे शहर ऐतिहासिक असून ते हिर्‍यां बरोबरच वस्त्रोद्योगासाठीही प्रसिद्ध आहे. त्यामुळे तेथे पैसवाल्यांची काही कमी नाही. सुरतेत सोन्याचे दागिने घालणारे व दाखविणार्‍यांची कमतरता नाही. पण सोन्यासह मिठाई खरेदी करुन ते पचविणे ही सुरत करांसाठी नवी गोष्ट होईल.
 
 
आपल्या हातामध्ये सकाळ पासून संध्याकाळपर्यंत असलेला स्मार्टफोन हा अतिशय अस्वच्छ (घाणेरडा) असून त्यामुळे आपल्याला अनेक रोग होत असल्याचे आढळून आले आहे. एवढेच नव्हे तर स्मार्ट फोनचा स्क्रीन टॉयलेट(स्वच्छतागृहा)पेक्षाही तीन पट घाण असतो! त्यावर सर्वात जास्त म्हणजे ८५ युनिट तर टॉयलेट सीट व फ्लशवर २४ युनिट जिवाणू बसलेले असतात. त्याखालोखाल फोनच्या बॅकवर व त्यानंतर लॉक आणि होम बटनवर जीवाणू वावरत असतात. आपला फोन घामामुळे घाण होत असतो. खाण्याच्या वेळी फोन पकडण्याने त्यावर सूक्ष्म जीव येत असतात.
 
 
तसेच ३५ टक्के लोक स्मार्ट फोन कधीच साफ करीत नसतात. त्यांचा घाम व हातावरील मळ यामुळे फोनवर जीवाणूंची वाढ होत असते. मोबाईल फोन साफ करण्यासाठी मायक्रो फायबर कपडा वापरावा. क्लिनिंग कीटनेही मोबाईल साफ केला जाऊ शकतो. स्वच्छतेच्या वेळी लिक्विड किंवा सॅनिटायझर किंवा हेअर ड्रायरचा वापर करु नये. मोबाईल टॉयलेटमध्ये मुळीच नेऊ नये. फोनच्या सफाईआधी तो स्वीच ऑफ केलेला असावा.
 
 
व्हॉट्स ऍप पेमेंट सेवेला भारतात मंजुरी मिळण्यासाठी व्हॉट्स ऍपने वाढते प्रयत्न सुरु केले आहेत. पेमेंट सेवेसाठी व्हॉट्स ऍपने भारतात आपले कार्यालय स्थापन केले आहे. या आठवड्यात व्हॉट्स ऍपच्या सीईओंनी सरकारशी बोलणी केली आहेत. माहिती तंत्रज्ञान मंत्रालया च्या आक्षेपामुळे अजूनपर्यंत व्हॉट्स ऍप पेमेंंट सर्विसला मंजुरी मिळालेली नाही. हे मंत्रालय फेक न्यूजच्या मुद्यावर व्हॉट्स ऍपशी सहमत नाही. व्हॉट्स ऍपच्या म्हणण्या नुसार सर्व मेसेजेसवर लक्ष ठेवणे शक्य नाही. तरीही व्हॉट्स ऍपने मेसेड फॉरवर्ड करण्यावर मर्यादा घातलेली आहेे. या फेक न्यूज व मेसेजेसमुळे देशात निष्पाप व्यक्ती जमावाच्या रोषास नाहक बळी पडल्या आहेत.
 
 
एक्सपायरी दिनी शेअर बाजारात चढउतार, निर्देशांकात वाढ
आज गुरुवारी फ्युचर्स ऍण्ड ऑप्शन्समधील बँक निफ्टीच्या साप्ताहिक एक्सपायरी दिनी शेअर बाजारात वारंवार चढउतार दिसून आले. तरीही त्याचे दोन्ही महत्वाचे निर्देशांक थोडया फार प्रमाणात वाढले. मुंबई शेअर बाजाराचा संवेदनशील निर्देशांक (सेन्सेक्स) सकाळी ३८ हजार ४१६ बिंदूंवर उघडून ३८ हजार ४८७ बिंदूंच्या सार्वकालिक उच्च पातळीवर जाऊन पोहोचला. दिवसअखेरीस तो ३८ हजार ५१ बिंदूंनी वाढून ३८ हजार ३३६ बिंदूंवर बंद झाला. तर राष्ट्रीय शेअर बाजाराचा निर्देशांक(निफ्टी)ने सकाळीच ११ हजार ६०० बिंदूंची मानसशास्त्रीय पातळी ओलांडीत ११ हजार ६२० बिंदूंवर उघडला व याच सार्वकालिक सर्वोच्च पातळीवरुन तो ११ हजार ५४६ बिंदूंच्या खालच्या पातळीपर्यंत जात दिवसअखेरीस ११ हजार ५८२ बिंदूंवर बंद झाला.
 
@@AUTHORINFO_V1@@