जळगावसह राज्यातील १००० ग्रा.पं.ची निवडणूक

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    24-Aug-2018
Total Views |

२६ सप्टेंबर रोजी मतदान, आचारसंहिता लागू

मुंबई :
राज्यातील विविध २६ जिल्ह्यांमधील १ हजार ४१ ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक; तसेच ६९ ग्रामपंचायतींच्या सरपंचपदाच्या रिक्त जागासांठी २६ सप्टेंबर २०१८ रोजी मतदान होणार आहे. त्यासाठी संबंधित ठिकाणी आजपासून आचारसंहिता लागू झाली आहे, अशी घोषणा राज्य निवडणूक आयुक्त ज. स. सहारिया यांनी आज येथे केली.
 
 
सहारिया यांनी सांगितले की, ऑक्टोबर २०१८ ते फेब्रुवारी २०१९ या कालावधीत मुदत संपणार्‍या व नवनिर्मित ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी हे मतदान होत आहे. यात सदस्यपदां बरोबरच सरपंचपदाच्या थेट निवडणुकांचाही समावेश आहे. त्यासाठी नामनिर्देशनपत्रे ५ ते ११ सप्टेंबर २०१८ या कालावधीत स्वीकारले जातील. त्यांची छाननी १२ सप्टेंबर २०१८ रोजी होईल. नामनिर्देशनपत्रे १५ सप्टेंबर २०१८ पर्यंत मागे घेता येतील व त्याच दिवशी चिन्ह वाटप होईल. मतदान २६ सप्टेंबर २०१८ रोजी सकाळी ७.३० ते सायंकाळी ५.३० या वेळेत होईल. गडचिरोली जिल्ह्यातील ग्रामपंचायतींसाठी मात्र सकाळी ७.३० पासून दुपारी केवळ ३.०० पर्यंतच मतदानाची वेळ असेल. मतमोजणी २७ सप्टेंबर २०१८ रोजी होईल.
 
सार्वत्रिक निवडणूक होणार्‍या ग्रामपंचायतींची जिल्हानिहाय संख्या :
ठाणे-६, रायगड-१२१, रत्नागिरी-१९, सिंधुदुर्ग-४, नाशिक- २४, धुळे-८३, जळगाव-६, अहमदगनर-७०, नंदुरबार- ६६, पुणे-५९, सोलापूर-६१, सातारा-४९, सांगली-३, कोल्हापूर- १८, बीड-२, नांदेड-१३, उस्मानाबाद-४, लातूर- ३, अकोला-३, यवतमाळ-३, बुलडाणा-३, नागपूर-३८१, वर्धा-१५, चंद्रपूर-१५, भंडारा-५, गडचिरोली- ५.
 
 
पोटनिवडणूक होणार्‍या सरपंचपदांच्या जिल्हानिहाय रिक्त जागा :
ठाणे-४, रायगड-३, सिंधुदुर्ग-१, नाशिक-८, धुळे-२, जळगाव-१, पुणे-६, सातारा-३, सांगली-१०, उस्मानाबाद-१, जालना-२, यवतमाळ-३, वाशिम-६, बुलडाणा-२, नागपूर-१, चंद्रपूर-२ आणि गडचिरोली-१४.
@@AUTHORINFO_V1@@