गुरुदास कामत यांच्या अंत्ययात्रेला सुरुवात

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    23-Aug-2018
Total Views |


 
 
मुंबई - काँग्रेसने आपला एक अमूल्य मोती गमावल्यामुळे काँग्रेस पक्षात शोककळा पसरली आहे. अश्रुपूरित नयनांनी काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते गुरुदास कामत यांच्या अंत्ययात्रेला मुंबई येथे सुरुवात झाली आहे. त्यांचे अंत्यदर्शन घेण्यासाठी मोठ्या प्रमाणात जनसमुदाय लोटला. काल सकाळी दिल्लीत हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने त्यांचे निधन झाले होते. काल रात्री त्यांचे पार्थिव मुंबई येथील त्यांच्या निवासस्थानी आणण्यात आले. आज चेंबूर येथे त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहे.
 
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, खासदार किरीट सोमैय्या, केंद्रीय मंत्री प्रकाश महेता, मल्लिकार्जुन खडगे, माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्यासह अनेक दिग्गज नेत्यांनी आज कामत यांच्या पार्थिवाचे अंत्यदर्शन घेतले.
 
ते केंद्रात २००९ ते २०११ दरम्यान गृहराज्यमंत्री होते. यावेळी त्यांनी माहिती तंत्रज्ञान आणि प्रसारण मंत्रीपदाचा अतिरिक्त भार संभाळला. जुलै २०११ मध्ये त्यांनी आपल्या मंत्रीपदाचा राजीनामा दिला होता. काँग्रेस पक्षाने कामत यांना पक्षाचा महासचिव बनविले होते आणि राजस्थान, गुजरात, दादरा-नगरहवेली आणि दमण-द्विप येथील प्रभारी केले. ते काँग्रेस पक्षाच्या उच्चस्तरीय निर्णय मंडळाचे (कार्यकारी समिती) सदस्य होते. 
@@AUTHORINFO_V1@@