डम्पिंगचा प्रश्न मार्गी लागणार

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    23-Aug-2018
Total Views |


 

शहापूर : शहापूर तालुक्यातील शहापूर नगरपंचायत,चेरपोली,आसनगांव,गोठेघर ,कळंभे ,खातिवली ग्रामपंचायतींना भेडसवणा-या डम्पिंगग्राऊंडचा प्रश्नावर शहापूर पंचायत समितीमध्ये आमदार पांडुरंग बरोरा यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत खातीवलीतील सर्वे नं २२६ या शासनाच्या आकार पडीत जागेत जिंदाल समूहाकडून घनकचरा निर्मुलन यंत्रणा उभारण्याचे एकमुखाने मंजुर करण्यात आले.
 

या सर्वच ग्रामपंचातयींचा कचरा व्यवस्थापनाचा प्रश्न उग्र झाला असून जागेचा प्रश्न गंभीर असल्याने सर्वच ग्रामपंचायतींना एकाच ठिकाणी कचरा संकलन करण्यासाठी जागा निश्चित होत नव्हती त्यामुळे सर्वच ग्रामपंचायती कचरा महामार्गीलगच वा इतरत्र रस्त्यालगत त्याची विल्हेवाट लावत असल्याच्या तक्रारी दिवसेंदिवस वाढत असल्याने या प्रश्नावर कायमस्वरूपी तोडगा काढण्यासाठी ही उपाययोजना करण्यात आल्याचे सांगण्यात येते.

 

दरम्यान वासिंद संघर्ष समितीचे अध्यक्ष संजय सुरळके यांनी वासिंदचा कचरा भातसा नदीपात्रात टाकला जात असल्याचे उघड केले होते.त्यावेळी सुरळके यांनी खातीवलीतील महसूल विभागाची जागा डम्पिंगग्राऊंड घनकचारा निर्मुलन यंत्रणा उभारण्यासाठी देण्यात यावी ,अशी मागणी केली होती. वासिंद येथील जिंदाल कंपनी घनकचरा निर्मुलन यंत्रणा स्वखर्चाने उभारणार असल्याचे सांगण्यात आले.

 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/

 
 
 
 
 
@@AUTHORINFO_V1@@