परिवहन थांबे कोणासाठी: प्रवाशांचा सवाल

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    23-Aug-2018
Total Views |


 

डोंबिवली : कल्याण डोंबिवली महापालिकाक्षेत्रातील बस थांब्यावर मोठ्या प्रमाणावर रिक्षाच्या रांगा दिसत असून हे परिवहन थांबे नक्की कुणासाठी असा सवाल नागरिक उपस्थित करीत आहेत. नव्याने बांधणी करण्यात आलेल्या बसथांबे धूळ खात पडत तर काही थांब्यावर प्रवाशांना ऐवजी फेरीवाल्यांची दाटी पाहता हा बस थांब्याचा घाट कशासाठी असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.
 

माजी परिवहन सभापती भाऊ चोधरी यांच्या काळात काही बस थांब्यांचा घाट नव्याने घालण्यात आला होता मात्र याही ठिकाणी रिक्षाच्या रांगा दिसत असल्याने अखेर नक्की रिक्षा थांबे आहेत की बस थांबे असे प्रश्न नागरिकांना पडत आहेत. या बस थांब्यावर लावण्यात आलेले बॅनर त्याच्या बाजुस लागणार्या रिक्षाच्या भल्या मोठ्या रांगा या मुळे नेमके हे बस थांबे ओळखण्यास नागरिकांना त्रास होत आहे . तसेच इंदिराचौक परिसरात होणारी वाहतूककोंडी लक्षात घेता परिवहन च्या बसेस थांब्यापासून हाकेच्य अंतरावर उभे राहत असल्याने हा थांब्याचा अट्टाहास का केला गेला. असे अनेक सवाल केला जात आहेत .

 

डोंबिवली पूर्व पश्चिमेस असणार्या एकूण लोकसंख्येच्या आधीक प्रमाणात उभ्या असलेल्या वाहनांमुळे अनधिकृत रिक्षा स्टँडमुळे नागरिकांकडून चालायचे कुठून हा प्रश्न असताना स्टेशन आणि फडके रोड शिवमार्केटचा परिसर येथील रहिवाशांसाठी डोकेदुखी ठरत आहे. पूर्वेतील बाजीप्रभू चौक फडके रोड भागात भाजी, फळे आणि फुले विक्रेत्यांनी रस्त्यावर पसरलेल्या वास्तव्यामुळे येथून चालावं तरी कसं, असा सवाल रहिवासी करत आहेत. रिक्षा आणि अन्य छोटया-मोठया वाहनांची संध्याकाळच्या वेळी होणारी गर्दी त्यातच अर्ध्या रस्त्यात उभी राहणारी बसेस वाहतूककोंडीत दिवसागणिक भरच पडत चालली असून, या परिसरात वाहतुकीला शिस्त लावण्यासाठी वाहतूक पोलिसही नसल्याने शहर वासीयांचे हाल सुरूच आहे .

 
 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/

 
@@AUTHORINFO_V1@@