वकासक सुपारीवाला याला २७ ऑगस्टपर्यंत पोलीस कोठडी

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    23-Aug-2018
Total Views |




मुंबई: परळ भागातील हिंदमाता परिसरातक्रिस्टल टॉवरइमारतीत लागलेल्या आगीप्रकरणी अटक झालेला विकासक अब्दुल रझाक ईस्माइल सुपारीवाला याला गुरुवारी दुपारी न्यायालयात हजर करण्यात आले. न्यायालयाने सुपारीवालाला २७ ऑगस्टपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. ‘क्रिस्टल टॉवरया इमारतीच्या १२ व्या मजल्यावर बुधवारी दि. २२ ऑगस्ट रोजी सकाळी भीषण आग लागली. यात चार जणांचा मृत्यू झाला. प्राथमिक तपासात इमारतीच्या प्रत्येक मजल्यावरील वीजपुरवठा करणाऱ्या केबलचे डक्ट बंदिस्त केले नसल्याने आग पसरत गेल्याचे उघड झाले आहे. इमारतीला निवासी दाखला मिळालेला नसतानाही रहिवासी वास्तव्य करत होते. त्यामुळे विकासक, वास्तूविशारद आणि रहिवाशांवर पोलिसांनी गुन्हे दाखल केले होते. अग्निशमन दलातर्फे तक्रार दाखल होताच पोलिसांनी बुधवारी सायंकाळी अब्दुल रझाक सुपारीवाला याला अटक केली होती. दरम्यान, गुरुवारी दुपारी सुपारीवालाला भोईवाडा न्यायालयात हजर करण्यात आले. न्यायालयाने अब्दुलला २७ ऑगस्टपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. दरम्यान सुनावणीवेळी विकासकाने स्वतःवरील आरोप धुडकावत अग्निसुरक्षेची जबाबदारी रहिवाशांवर ढकलली आहे.

 

भोगवटा प्रमाणपत्राविना विकल्या सदनिका

अग्निशमन दलाने दाखल केलेल्या तक्रारीत भोगवटा प्रमाणपत्राविना घरे विकल्याचा आरोप करण्यात आला आहे. इमारतीत अग्निसुरक्षेबाबत कोणतीही काळजी घेतलेली नसल्याचेही यात म्हटले आहे. इमारतीच्या आठव्या मजल्यावर बेकायदा बांधकाम केल्याप्रकरणी पालिकेने कारवाई केली होती, असा युक्तिवाद पालिकेतर्फे यावेळी करण्यात आला.

 
 
 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/

 
@@AUTHORINFO_V1@@