गुरुदास कामत यांच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    23-Aug-2018
Total Views |


 

मुंबई : काँग्रेस पक्षाचे वरिष्ठ नेते आणि माजी राज्यमंत्री गुरुदास कामत यांच्यावर गुरुवारी शासकीय इतमामात चेंबूर येथील स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यापूर्वी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कामत यांच्या निवासस्थानी जाऊन पुष्पचक्र अर्पण करून श्रद्धांजली वाहिली. कामत यांच्या मुलाने त्यांना मुखाग्नी दिला.
 

कामत यांचे पार्थिव अंतिम दर्शनसाठी त्यांच्या चेंबूर येथील निवासस्थानी ठेवण्यात आले होते. त्यांना श्रद्धांजली वाहण्यासाठी भाजपचे कॅबिनेट मंत्री प्रकाश मेहता, माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, माजी मंत्री चंद्रकांत हंडोरे, माजी मंत्री नसीम खान, काँग्रेसचे महाराष्ट्र प्रभारी मल्लिकाजुर्र्न खर्गे, महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण, खा. नारायण राणे आदी उपस्थित होते.

 

कामत यांच्यावर चेंबूरच्या चरई येथे दुपारी स्मशानभूमीत शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले. काँग्रेस पक्षाचे वरिष्ठ नेते माजी राज्यमंत्री गुरुदास कामत यांचे बुधवारी दि. २२ ऑगस्ट रोजी सकाळी दिल्लीत हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. रात्री १० च्या सुमारास कामत यांचे पार्थिव दिल्लीहून मुंबईला आणण्यात आले. विमानतळावरून कामत यांचे पार्थिव त्यांच्या चेंबूरच्या निवासस्थानी दाखल झाले. यावेळी शेकडोंच्या संख्येत कार्यकर्ते हजर होते. गुरुवारी सकाळी १० .३० वाजेपर्यंत कामत यांचे पार्थिव अंतिम दर्शनासाठी ठेवण्यात आले होते.

 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/

 
@@AUTHORINFO_V1@@