अटलजी : दूरदृष्टीचे महान नेते

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    23-Aug-2018
Total Views |



विज्ञान-अंतराळ क्षेत्रात क्रांती करतानाचांद्रयान-या मोहिमेचा पाया रोवला गेला. वाजपेयीजींची भारतासाठी सर्वात मोठी देण म्हणून जी पुढे पिढ्यान्पिढ्या गणली जाईल ती म्हणजे अणुचाचणी.

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/

 

मुलतः मी एक स्वयंसेवक आहे. त्यामुळे उत्तुंग संस्कार, नैतिकता आणि राष्ट्राभिमान यांचे बाळकडू मला लहानपणापासूनच मिळाले, याचा मला आनंद आहे. प्रसंगी कठोर प्रसंगी अफाट निर्णय क्षमता यांचा संगम मला अटलजींच्या ठायी कायम दिसतो. त्यांची आंतरराष्ट्रीय आणि प्रशासकीय क्षेत्रातील निर्णयक्षमताही वाखाणण्याजोगी होती. एकीकडे कठोर असणारे अटलजी कार्यकर्त्यांचा बाबतीत मात्र हळवे होते. अटलजींच्या दूरदृष्टीने भारताला भविष्याची दिशा दिली, असे म्हटले तर वावगे ठरणार नाही. रस्ते, पाणी भारतातील सर्वसामान्य जनतेपर्यंत पोहोचविणे, त्यांना त्यांच्या सुविधा देणे याचे महत्त्व त्यांनी जाणले होते. या सुविधा जर नागरिकांपर्यंत पोहोचविल्या, तर राष्ट्रविकासाला वेळ लागणार नाही याची पूर्ण कल्पना अटलजींना होती. या त्यांच्या दूरदृष्टीचा आज आपणाला प्रत्यय येत आहे.

 

औद्योगिक क्षेत्रात, खाजगी क्षेत्रात डिसइनव्हेस्टमेंटची मुहूर्तमेढ त्यांनी रोवली. ‘किमान सरकार, कमाल कामहे सूत्र त्यांनी नेहमीच अंगिकारले. बालको, हिंदुस्तान झिंक, इंडियन पेट्रो केमिकल लि., विदेश संचार निगम लिमिटेड यांचा यासंदर्भात प्रामुख्याने उल्लेख करावा लागेल. त्यांच्या कार्यकाळात -0. टक्के (सन २००० मध्ये) असणारे सकल राष्ट्रीय उत्पादन (जीडीपी) सन २००५ मध्ये . टक्के इतक्या वाढीवर पोहोचले. त्यांनीच ही किमया करून दाखविली. आर्थिक क्षेत्रातील त्यांचे हे योगदान अवर्णनीय आहे. दूरसंचार क्षेत्रातील क्रांती वाजपेयी यांच्याच कार्यकाळात झाली. दूरसंचारमधील धोरणांना त्यांनी स्व. प्रमोद महाजन यांच्या माध्यमातून गतिशीलता प्रदान केली. या माध्यमातून त्यांनी सरकारी महसूल वाढीसाठी वेगळे पाऊल उचलले. या त्यांच्या धोरणामुळे विदेश संचार निगम लि. ची एकाधिकारशाही थांबविली गेली.

 

विज्ञान-अंतराळ क्षेत्रात क्रांती करतानाचांद्रयान-या मोहिमेचा पाया रोवला गेला. वाजपेयीजींची भारतासाठी सर्वात मोठी देण म्हणून जी पुढे पिढ्यान्पिढ्या गणली जाईल ती म्हणजे अणुचाचणी. या माध्यमातून त्यांनी शांततेसाठी अणुशक्ती या नव्या विचाराची पायाभरणी केली. अणुचाचणीच्या निर्णयामुळे भारताला जागतिक नकाशावर मानाचे स्थान आणि उंची गाठता आली. अणुचाचणीला असणारा अंतर्गत विरोध आणि बाह्यपरिणाम याची संपूर्ण कल्पना असताना, त्यांनी जी कृतिशीलता दाखविली त्यातूनच त्यांची निर्णयक्षमता, मुत्सद्दीपणा आणि कणखरता दिसून येते. त्यांच्या या निर्णयामुळेना झुकेंगे, ना झुकने देंगेया तत्त्वावर आपण आंतरराष्ट्रीय स्तरावर कार्य करत आहोत. आर्थिक क्षेत्रात एनपीए (नॉन परफॉर्मिंग असेट) कमी करण्याच्या उद्देशाने असेट रिकन्स्ट्रक्शन कंपनी स्थापण्याचा अभिनव प्रयोग यामुळे सहज शक्य झाला. त्याद्वारे अनेक कंपन्यांना दिवाळखोरीपासून वाचविण्यास मदत झाली.

 

वाजपेयींची निर्णयक्षमता ही त्यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे स्वयंसेवक आणि प्रचारक म्हणून केलेल्या तपश्चर्येतून आलेली आहे. आज पक्षाला चांगले दिवस आले आहेत. अनेक लोक सत्ताधारी पक्षात एक मजबूत पक्ष म्हणून सामील होत आहेत. त्या सर्वांसाठी अटलजींचे चरित्र आणि नैतिकत्व अभ्यासून पुढे मार्गक्रमण करण्याची मोठी संधी आहे. अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत संघर्ष करून, स्वतःला जीवनाच्या प्रत्येक पातळीवर सिद्ध करून देशाच्या सर्वोच्चपदी विराजमान होऊनही त्यांचे पाय सदैव जमिनीवर होते. म्हणूनच सर्व कार्यकर्त्यांनी त्या पाऊलखुणांचा आदर्श बाळगून मार्गक्रमण करावे, असे मला वाटते. त्यांचे कविमन आणि स्वभावातील मृदूता ही सगळ्यांनाच प्रिय होती. त्यांचे देहरूपी आपल्यात नसणे हे जरी दुःखदायक असले तरी, त्यांचे विचार, त्यांचा मार्ग आणि त्यांची नैतिकता यांचा आदर्श ते आज आपल्यापुढे ठेवून गेले आहेत. भारतीय राजकारणातील ऋषितुल्य जरी आज हरपला असला तरी, त्यांचा सहवास हा आपल्यासोबत आशीर्वाद रूपाने नक्कीच आहे. त्यांच्या पदपथावर मार्गक्रमण करणे, हीच खरी त्यांना श्रद्धांजली ठरेल!

 

प्रदीप पेशकार

 
 
 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/

 
@@AUTHORINFO_V1@@