दैवत्वाचे परिमाण लाभलेले सेवाकार्य

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    23-Aug-2018   
Total Views |




रा.स्व.संघाचे निष्ठावान निरलस सेवाभावी प्रचारक नारायण हरी तथा नाना पालकर यांची स्मृती चिरंतन जागविण्यासाठी नाना पालकर स्मृती समितीची स्थापना 1968 मध्ये करण्यात आली. साधू आणि देव ओळखण्याचा एक संतविचार आपल्याकडे आहे तो म्हणजे- जे का रंजले गांजले, त्यांसी म्हणे जो आपुले, तोची साधु ओळखावा, देव तेथेचि जाणावा।ते दैवत्व आणि साधूपण ‘नाना पालकर स्मृति समिती’ च्या सेवाकार्यात आणि विचारांत वसले आहे.

 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/


मी रामकृष्ण परमहंस म्हणाले होते की, “बंधुभावाने केलेल्या सेवेपेक्षा आत्मभावाने केलेली सेवा ही सर्वोत्तम आहे. नेमकी हीच सर्वोत्तम सेवानाना पालकर स्मृति समितीकरत असते. ‘नाना पालकर स्मृति समितीचीरुग्ण सेवाहीच ओळख आहे  कर्करोगासाठी नामांकित असलेले टाटा रुग्णालयच नव्हे तर त्या परिसरातील रस्त्यांवरही ओझरता दृष्टिक्षेप टाकला तरी देशभरातून आलेल्या कर्करोगाग्रस्त व्यक्तींची अवस्था जीवाला अस्वस्थ करून जाते. या रुग्णांना मुंबईत राहून टाटा इस्पितळात उपचार करावे लागतात. राहणे, खाणे, इस्पितळात जाणेयेणे, औषधोपचार यावर अफाट आणि क्षमतेपलीकडे खर्च होतो. खर्चाच्या डोंगरात कुटुंबे उद्ध्वस्त होतात. अक्षरशः रस्त्यावर येतात. टाटा इस्पितळाच्या आजूबाजूला कर्करोगग्रस्त रुग्ण आणि त्यांचे काळजीने सुकलेले नातेवाईक ऊन-वारा-पावसात रस्त्यावर पथारी टाकलेले दिसतात. या सर्वांची सोय करता येणे शक्य नाहीच. पण या पार्श्वभूमीवरनाना पालकर स्मृति समितीचेरुग्ण सेवा सदनकाम करते

 

रुग्णसेवा सदन

सध्या समितीची दहा मजली वास्तू असून बाहेरगावाहून आलेल्या ७६ रुग्ण त्यांचे प्रत्येकी दोन सहकारी अशा एकूण २२८ जणांची निवासव्यवस्था आहे. एका खोलीमध्ये दोन रुग्ण आणि त्यांचे दोन-दोन नातेवाईक राहू शकतात. एका खोलीमध्ये स्वतंत्र स्नान स्वच्छतागृहे, पंखे, सोलारद्वारे गरम पाण्याची व्यवस्था, लॉकर्सची सुविधा आहे. सदर खोलीची स्वच्छता तेथे राहणाऱ्या लोकांनीच करावयाची असते. समितीच्या अन्नपूर्णा योजनेअंतर्गत सदनातील भोजनालयात रुग्ण त्यांचे नातेवाईक यांना भोजन 10 रुपयांत अल्पोपहार रुपयांत सवलतीच्या दरात देण्यात येते. बरेचसे रुग्ण रुग्ण सेवा सदनमध्ये राहून उपचार करून गेले आहेत. रुग्ण सेवा सदनात राहणाऱ्या रुग्णांना उपचारासाठी इस्पितळात जावे लागते. त्यांचा विचार करून समितीने अत्यंत कमी शुल्कात रुग्णवाहिका उपलब्ध केली आहे. सदन ते टाटा, वाडिया, के. .एम. रुग्णालयात रुग्णांना विनामूल्य त्यांच्या सोबतीला असणाऱ्या व्यक्तींसाठी प्रत्येकी रु. 5 असे नाममात्र शुल्क आकारले जाते. तसेच इतरत्र जाण्यासाठी अत्यंत अल्प शुल्कात ही सेवा उपलब्ध आहे.

 

नाना पालकर चिकित्सालय

रुग्ण सेवा सदनकेवळ कर्करोग पीडितांसाठीच नाही तर त्यांच्या सोबतीला येणाऱ्या नातेवाईकांचा, सहकार्यांचीही आईच्या मायेने काळजी घेते. सदनामध्ये नाना पालकर चिकित्सालय आहे. बाहेरगावाहून रुग्णांसोबत येणाऱ्या सहयोगी तसेच सदनाच्या जवळपास राहणाऱ्या रहिवाशांसाठी तपासणी, औषधे, रक्तदाब मोजणी तसेच शस्त्रक्रिया झालेल्या निवासी रुग्णांसाठी मलमपट्टी, ड्रेसिंग वगैरेसाठी सदनातनाना पालकर चिकित्सालयकार्यरत आहे. सेवाभावी डॉक्टर्स हे काम बघतात. तपासणी, औषधे इंजेक्शने यासाठी रु. १० रक्तदाब मोजणीकरिता रु. 5 इतकेच शुल्क आकारले जाते. गरीब रुग्णांसाठी विनामूल्य सेवा दिली जाते. सदनाच्या तळमजल्यावर श्रीगणेश मंदिर असून दररोज संध्याकाळी वाजता तेथे आरती केली जाते. तसेच यावेळी अथर्वशीर्ष, गीतापाठ, भजन इत्यादींमध्ये निवासी रुग्ण त्यांचे सहयोगी सहभागी होतात. सदनांत ग्रंथालयाची व्यवस्था असून पुस्तके, मासिके, वर्तमानपत्रे ठेवण्यात आली असून मनोरंजनासाठी दूरदर्शनची व्यवस्थाही आहे.

 

अर्थात कर्करोगाने ग्रस्त असलेल्या रुग्णांना निवास आणि भोजनाची सेवा उपलब्ध करणाऱ्या मुंबईत इतरही संस्था आहेत, पण समितीच्यारुग्ण सेवा सदनाची स्वच्छता, सकारात्मक शिस्त, आत्मीयता आणि समितीने जपलेली माणुसकी ही समितीची अस्मिताच आहे, असे म्हणायला हवे. ‘रुग्ण सेवा सदनहे आर्थिक मोबदल्यासाठी नसल्याने इथे केवळ माणुसकीच्या तरल संवेदनशीलतेचे आदानप्रदान होत असते. रुग्ण हा इथला काही दिवसांचा रहिवाशी नसतो. तर तो या समितीच्या कुटुंबाचा एक भाग बनून जातो. आजपर्यंत हजारो रुग्ण समितीच्या या निर्लोभ वृत्तीच्या सेवाभावामुळे देशभरातून कर्करोग पीडित व्यक्ती मुंबईत उपचारासाठी आल्या कीरुग्ण सेवा सदनाकडे येतात. इथे निवास प्रवेश मिळावा म्हणून कोणताही वशिला चालत नसल्यामुळे नियमानुसारच रूग्णांना प्रवेश मिळतो. याबाबत एक घटना अतिशय मनस्वी आहे. एके दिवशी एक टॅक्सीचालक समितीच्या कार्यालयात आला. त्याला रुग्णसेवा सदनाला देणगी द्यायची होती. त्याचे म्हणणे, गेली कित्येक वर्षे तो मुंबईत परळ भागात टॅक्सी चालवायचा. परळ स्टेशनला उतरणारे कर्करोगग्रस्त रुग्ण आणि त्यांचे नातेवाईकनाना पालकर स्मृति समितीबद्दल बोलायचे. वर्षे बदलली, येणारे जाणारे रुग्णही बदलले. मात्रनाना पालकर स्मृति समितीच्या कामाबद्दल तोंडभरून बोलणाऱ्या लोकांच्या वृत्तीत फरक पडला नव्हता. वर्षोनुवर्षे दर्जेदार आणि इतकी चांगली सेवा देणाऱ्या संस्थेला आपल्या ऐपतीप्रमाणे देणगी द्यायलाच हवी, असे त्याचे अंतर्मन त्याला प्रेरित करी. कदाचित सामान्य घटना असेल, पण या घटनेतूननाना पालकर स्मृति समितीचे अतिसामान्यत्व मनावर गारूड घालते.

 
 
 

गोखले डायलेसिस केंद्र

आरोग्य सेवा देताना सर्व स्तरावर समितीचे काम अष्टदिशांनी व्यापलेले आहे. सदनामध्येगोखले डायलेसिस केंद्रआहे. किडनी खराब झाली की डायलेसिसशिवाय पर्याय नाही. हा अत्यंत आवश्यक आणि खर्चिक उपचार. दर आठवड्याला किमान दोन-तीन वेळा डायलेसिस करणे क्रमप्राप्. कर्करोग उपचारासारखाच डायलेसिसही रुग्णाच्या आर्थिक परिस्थितीचा बोजवारा उडवणारा उपचार. सर्व साधारणपणे रु. ७५० ते १२०० एका डायलेसिसला द्यावे लागतात. समितीने याचा विचार करून रु. 350/- शुल्क ठेवले आहे. सन २००४ पासून आजपर्यंत या शुल्कात वाढ केलेली नाही. सदनात एकूण १४ मशीन्स कार्यरत आहेत. रोज तीन पाळ्यांमध्ये एकूण 36 रुग्णांना या सेवेचा उपयोग होतो. योग्य तंत्रज्ञ, डॉक्टर तसेच तीन नेफ्रोलॉजिस्ट सदर विभागात कार्यरत आहेत. या सेवेचा लाभ हजारो रुग्णांनी घेतला आहे.

 

डॉ.. कृ. पाटणकर क्षयरोग

चिकित्सा केंद्र

क्षयरुग्णांना सरकारतर्फे जरी औषधै विनामूल्य असली तरी क्षयरुग्णालयांतून उपचार घेऊन आलेल्या रुग्णांची नियमित तपासणी, त्यांना हवी असलेली आषधे याबाबत आर्थिकदृष्ट्या गरीब रुग्णाची कमालीची हेळसांड होते. समितीतर्फे क्षयरुग्णाच्या उपचारार्थडॉ. . कृ. पाटणकर क्षयरोग चिकित्सा केंद्रचालवले जाते.

 

प्रभाकर कुटुंब कल्याण केंद्र

सध्या एड्स / एच.आय.व्ही. या आजाराने समाजात एक प्रकारचे भय निर्माण केले आहे. याबाबत योग्य मार्गदर्शनाअभावी बरेच गैरसमज वाढून तरुण वर्गाचे संबंधित कुटुंबाचे खूपच नुकसान होते. या सर्वांचा विचार करून सन 2003 मध्ये प्रभाकर कुटुंब कल्याण केंद्राची स्थापना सदनात करण्यात आली. प्रशिक्षित सल्लागार एडस् /एच.आय.व्ही. बाबत मार्गदर्शन करीत आहेत.

 

तुलसियानी स्पेशालिटी लॅबोरेटरी

त्याचबरोबररुग्ण सेवा सदनच्या 8 व्या मजल्यावर तुलसियानी स्पेशालिटी लॅबोरेटरी कार्यरत असून सर्व रक्तचाचण्या अत्यंत सवलतीच्या दरात अथवा मोफत केल्या जातात. विविध गंभीर आजारांवर सेवावृत्तीने समाजाला आर्थिक, मानसिक आणि सर्वच स्तरांवर सहयोग करताना समिती विविध अंगाने आरोग्य समस्यांचा तुलनात्मक विचार करते. रुग्णांच्या सर्वांगीण कल्याणासाठी काय करता येईल यासाठी कार्य करते.

 

त्यानुसार इतर उपक्रम :-

* रक्तदान शिबीर, रक्तसूची

अनेकदा शस्त्रक्रियेसाठी रक्ताची गरज असते. समितीद्वारे दरवर्षी परळ, बोरीवली, ठाणे येथे रक्तदान शिबिरे आयोजित केली जातात. बाहेरगावाहून येणाऱ्या रुग्णांना आवश्यक त्या गटांच्या रक्ताची यथासंभव व्यवस्था रक्तसूचीद्वारा केली जाते. त्यासाठी समिती रक्तदान शिबिरे भरवते रक्तसूची तयार करते.

 

* नाना पालकर योगविद्या निकेतन

इथे योगाचार्य निंबाळकर गुरुजी यांच्या प्रशिक्षकांकडून सदनात सोमवार ते शुक्रवार संध्याकाळी .३० ते .३० या वेळेत पुरुष महिलांसाठी तीन वर्ग चालतात.

 

* मधु औषधपेढी

अनेक रुग्णांना केवळ आर्थिक असहाय्यतेमुळे वैद्यकीय उपचार पूर्ण करणे शक्य होत नाही. तसेच औषधोपचार विविध प्रकारच्या तपासण्यांसाठी ही मदत खास करून म्युनिसिपल, राज्य सरकारच्या रुग्णालयातील सर्वसाधारण रुग्णांना दरमहा दिली जाते. त्यासाठी संस्थेने प्रतिमास 3 लाखांची तरतूद केली आहे. या उपक्रमाला नाव आहेमधु औषधपेढी.’

 

* शैक्षणिक उपक्रम

समितीतर्फे सदनात सामाजिक, शैक्षणिक उपक्रमही राबविले जातात. ‘भारतीय मर्दनकला शास्त्र’ (मसाज प्रशिक्षण) चे प्रशिक्षण दिले जाते.

 

* अन्नपूर्णा योजना

औषधे,निवासी रुग्णांची सर्वांगीण काळजी याहीपलीकडे जाऊन समिती अन्नपूर्णा योजना राबवते. वाडिया मुलांचे रुग्णालय, परळ, बी.वाय.एल् नायर रुग्णालय, मुंबई सेंट्रल, टाटा कॅन्सर सेंटर, परळ , क्षयरोग रुग्णालय, शिवडी, इंडियन कॅन्सर सोसायटी, पुनर्वसन शिवडी, वाडिया मुलांचे रुग्णालय, परळ या इस्पितळांमध्ये नियमितपणे किंवा ठरलेल्या दिवशी अन्न, नाष्टा, फळवाटप वगैरे केले जाते.

 

* रुग्णमित्र

समितीच्यारुग्णमित्रसंस्थेच्या विविध उपक्रम कार्याची माहिती सभासद, देणगीदार, हितचिंतक यांना करून देणे आणि विविध विषयांवर मार्गदर्शन करणे या उद्देशाने रुग्णमित्र हे त्रैमासिक कार्यरत आहे

असो, नाना पालकर सेवा समितीचे काम फक् परळच्या इमारतीतून चालते का, तर तसे नाही बरं.

 

कै. डॉ. शिवानंद पु. लवेकर दवाखाना

गरजू गरीब रुग्णांना वैद्यकीय सल्ला, औषधे, इंजेक्शने अत्यंत कमी किमतीत उपलब्ध व्हावी म्हणून टाटा हॉस्पिटलसमोर श्रद्धा इमारतीमध्ये चिकित्सालयाची कै. डॉ. शिवानंद पु. लवेकर दवाखाना या नावाने सेवा सुरू करण्यात आली. सन 2004 साली डॉ. शैलजा लवेकर यांनी आपले दिवंगत पती डॉ. शिवानंद लवेकर यांचा सदर दवाखाना समितीला विनामूल्य वैद्यकीय सेवेसाठी दिला.

नाना पालकर स्मृति समिती,

 

बोरीवली शाखा

बोरीवलीमध्येही समितीची शाखा आहे. समितीची ही शाखा सन 1990 पासून कार्यरत आहे. या शाखेत वैद्यकीय सेवा साहाय्य रुग्णोपयोगी सामान अत्यल्प शुल्कात उपलब्ध करून दिली जातात. रक्तदान शिबीर, रक्तगट चाचणी रक्तदाते सूची विद्यार्थी शिक्षक यांची वैद्यकीय तपासणी केली जाते. इथे वाचनालयाची सुविधाही आहे.

नाना पालकर स्मृति समिती,

 

ठाणे शाखा

समितीची ठाणे शाखा सन २००८ पासून कार्यरत आहे. रुग्णोपयोगी सामान अत्यल्प किमतीत उपलब्ध करून दिले जाते. इथे महिलांसाठी योगासनांचे वर्ग चालतात. समाजस्वास्थ्य व्याख्यानमालेचे आयोजन केले जाते. रक्तदान शिबीर, रक्तगट चाचणी रक्तदाते सूची तयार केली जाते. रुग्णालयात बाळाचे कपडे वाटप, मातांना पोषक आहार फळेवाटप केले जाते. आहार, योगविषयी सल्ला केंद्रही चालवले जाते. इतकेच नव्हे तर सेवाभावी व्यक्तींना हुरूप यावा म्हणून आदर्श रुग्ण सेवकांचा सन्मानही केला जातो.

 

समितीचा सेवेचा वटवृक्ष आज स्थिरावला आहे, तो समितीलाच सर्वस्व मानून काम करणाऱ्या समितीच्या पदाधिकार्यांमुळे. समितीचे पदाधिकारी म्हणजे उत्साहाचा आणि आशेचा झरा. आरोग्यासंबंधी कोणतीही समस्या असली की, मदतीला तत्परतेने पुढे येणारच येणार. जर मदत करणे शक्य नसेल तर इतरत्र कुठून उपयोग होईल, याची जातीने चौकशी करून ती मदत उपलब्ध करून देतातच देतात. पण ही मदत आम्ही देणारे, तुम्ही घेणारे अशा वृत्तीने नसते तर गरीब रुग्णाला आपण आजारातून बरे होऊच, हा आत्मविश्वास देत समिती मदत करते. गोस्वामी तुलसीदास म्हणतात, “सर्वात कठीण धर्म सेवा आहे.” तर अशा या कठीण धर्माचे व्रत अंगिकारलेल्या नाना पालकर स्मृति समितीचे कार्य म्हणजे साधू आणि दैवत्वाचे परिमाण लाभलेले सेवाकार्य आहे, असे म्हणायला हरकत नाही.

 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/

@@AUTHORINFO_V1@@