खारफुटी व पाणथळींवरील अतिक्रमणांचा धोका

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    22-Aug-2018   
Total Views |




 


महाराष्ट्र सरकारतर्फे गोराई व दहिसरला खारफुटी उद्यानांची निर्मिती करण्यात येणार आहे. त्यानिमित्ताने मुंबई तसेच महाराष्ट्रातील खारफुटीच्या सद्यस्थितीची माहिती देणारा हा लेख...

 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/
 
 
भारतातीलच नव्हे तर जगभरातील जंगलांचा हिरवा रंग करड्या रंगात बदलत चालला आहे. भयसूचक बाब म्हणजे, वैश्विक तापमान बदल व तापमान वाढीमुळे २००१ ते २०१४ या काळातील विशिष्ट प्रकारच्या (core) जंगलांचा व खारफुटी वनांचा हिरवा रंग करड्या रंगात बदलत आहे. ‘इस्रो’च्या ‘एनआरएससी’च्या हैद्राबादमधील चार सदस्यांनी देशातील जंगलांविषयी संशोधन केले असता, त्यांना आढळले की, १४ प्रकारच्या ४६.३६ लाख हेक्टर मुख्य (core) जंगलांचा व ४१,४८० हेक्टर खारफुटी जंगलांचा हिरवा रंग कमी कमी होत असून ही जंगलं करड्या रंगाची होत आहेतदेशातील एकूण जंगल क्षेत्र ७ कोटी ८ लाख २७ हजार ३०० हेक्टर क्षेत्रफळात पसरले आहे व त्यापैकी ५५ लाख २ हजार ८६० हेक्टर जंगलांचा (सुमारे ८ टक्के) रंग बदलत चालला आहे. ही बाब खरोखरच देशाच्या पर्यावरणाच्या दृष्टीने चिंताजनक आहे.

 

याशिवाय २० ठिकाणांच्या सुरक्षित ठेवलेल्या जंगलांचीसुद्धा रंगांच्या बाबतीत अशीच घसरण होताना दिसते. सर्वाधिक खालावलेला दर्जा आहे तो ओडिशाच्या समान वन्य अभयारण्याचा. एका संशोधकाने (जो आधीच्या चार सदस्यांमध्ये सामील झालेला नाही) असे सांगितले आहे की, पश्चिम घाट व हिमालयाकडील जंगलांची स्थिती खालवण्याची सुरुवात २००० सालापासूनच झाली. जंगलांचा हा स्तर खालावणे म्हणजे केवळ ‘रंग बदलणे’च नाही, तर अशा जंगलांतील जैवविविधतेचा दर्जाही दिवसेंदिवस घसरत चालला आहे. या सगळ्याचे कारण म्हणजे, आपला देश उष्ण कटिबंधात वसलेला आहे. या सर्व परिस्थितीचा सर्वाधिक तडाखा बसला आहे, तो पश्चिम बंगालमधील जंगलांना. तेथील जंगले ५० हजार ५५० हेक्टर क्षेत्राची आहेत. त्यापैकी ८३ टक्के भागात मुख्य जंगल आहे व उर्वरित खारफुटीचे १५.६ टक्क्यांहून जास्त जंगल करड्या रंगांनी व्याप्त होत चालले आहे. ‘खारफुटी’ व ‘पाणथळी’ या गोष्टी महत्त्वाच्या असल्याने त्यांची माहिती थोडक्यात आपण परत अभ्यासू.

 

‘खारफुटी’ म्हणजे ‘सुरक्षाकवच’

 

ही वने विविध माशांच्या प्रजाती, विविध वनस्पतींच्या जाती-उपजाती व विविध छोटे प्राणी यांच्या अधिवासाची ठिकाणे आहेत. ही खारफुटीची वने विशेषकरून शिवडी, ठाणे परिसरात फ्लेमिंगो, हेरॉन इत्यादी सुंदर प्रवासी पक्ष्यांची वास्तव्याची ठिकाणे आहेत. ही वने जलप्रलयाच्या संकटकाळी व जमीन खचण्यापासून वाचविण्यासाठी आधार देतात. उत्तम उदाहरण म्हणजे, तामिळनाडूमधील पीचावरम व मुथूपेठ या गावात २००४ सालीच्या त्सुनामी संकटाच्या वेळी खारफुटींनी संरक्षण केल्याने जीवितहानी व वित्तहानी कमी झाली. २००५ सालीच्या मुंबईतील जलप्रलयावेळी खारफुटींनी मदत केल्यामुळे मृतजीवांची संख्या एक हजारांवर थांबलीया खारफुटी वनस्पती इतर वनस्पतींपेक्षा आठपट कार्बन डायऑक्साईड शोषून घेत असल्याने वायू प्रदुषणाची व्याप्ती कमी करण्यात प्रामुख्याने हातभार लावतात.

 

‘पाणथळी’ म्हणजे काय?

 

ही थोड्या काळाकरिता वा कायमच्या मोसमाप्रमाणे पाण्याने भरलेली असतात. ही नदीतीरांवर, समुद्रकिनाऱ्यालगत, नदीमुखाजवळ, खाडीजवळ पाणी वा चिखलाने भरलेली असतात. नद्या-नाले, खाड्या, समुद्राचे पाणी, मानवनिर्मित तलाव इत्यादी जलसमुदायांचा या पाणथळीमध्ये समावेश होतो.

 

मुंबई महानगरातील किती पाणथळी क्षेत्र (हेक्टरमध्ये) नष्ट केले गेले?

 

सई (६०), भिवंडी (४०), मीरा-भाईंदर (६०), कशेळी (३२), दहिसर (४), कांदिवली (८०), ओशिवरा (१६०), मुलुंड (६), कन्नमवारनगर (४), गोवंडी (६)

 

मुदत उलटली तरी ‘पाणथळ संवर्धन’ स्थापनेकरिता प्राधिकरणाची स्थापना झाली नाही. पाणथळ जागांच्या र्‍हासाच्या अनेक घटना घडत असताना सर्वोच्च न्यायालयाने फेब्रुवारी २०१७ मध्ये देशातील अडीच हेक्टरांपेक्षा अधिक क्षेत्रफळ असणार्या पाणथळांचे संवर्धन करण्याचा आदेश दिला आहे. ही संख्या दोन लाख, एक हजार ५०३ इतकी आहे. पण, केंद्र सरकारने २०१७ च्या सुधारित नियमात बदल करून पिण्याच्या पाण्यासाठी, सिंचनासाठी बांधलेल्या धरणांसाठी, नद्यांसाठी, मिठागरे अशा अनेक पाणथळ जागांना वगळून टाकले आहे. अडीच हेक्टरांपेक्षा अधिक क्षेत्र असणार्‍या पाणथळांची संख्या १७ हजारांच्या आसपास आहे. सुधारित नियमानुसार ही संख्या अर्ध्याहून कमी होण्याची शक्यता आहे. तरीदेखील सरकार प्राधिकरण स्थापन करण्यास उदासीन राहिले आहे. ‘वेटलॅण्ड म्हणजे वेस्टलॅण्ड’ अशीच भूमिका आजवर राहिली आहे. त्यामुळेच पाणथळ जागांना अतिक्रमण, प्रदूषण आणि विकासकामांचा फटका बसत असल्याच्या घटना पर्यावरण कार्यकर्ते नमूद करतात.

महाराष्ट्रातील इतर जिल्ह्यांतील पाणथळीचे क्षेत्र (चौ. किमीमध्ये)

 

पुणे (६८१), पालघर (६१२), ठाणे (५९९), रायगड, रत्नगिरी (२०९), सिंधुदुर्ग (१३९).

 

हवेतून बिया टाकून खारफुटींची लागवड

(एरिअल ब्रॉडकास्टिंग)

 

भारतात प्रथमच ज्या ठिकाणी दलदलीचा प्रदेश असल्याने वेटलॅण्ड व मडफ्लॅट ठिकाणी पोहोचता येत नाही, तिथे हेलिकॉप्टरमधून बिया टाकून लागवड सुरू केली आहे. प्रथम प्रयोगाकरिता बर्‍याच ठिकाणी आढळणारी अविसेनिया मरीना (करड्या खारफुटी) लागवडीकरिता घेतल्या. शिवाय अविसेनिया ऑफिसिनालिज ही वनस्पती घेतली. ही एरिअल ब्रॉडकास्टिंग पद्धत स्वस्त पडते. त्याचे काम जलद होते. खारफुटींच्या जागेवर त्यामुळे जावे लागत नाही. नेहमीच्या पद्धतीत फक्त वर्षातून एकदा लागवड करण्याऐवजी परत लागवड करता येते.

 

नेहमीच्या पद्धतीत छोटी खारफुटीची झाडे कुंड्यांमधून किंवा बिया, बोटीमधून न्यायला लागतात. ही पद्धत खर्चिक व विलंबाची आहे. अमेरिकेत लुझियाना येथे अशीच हवेतून खारफुटीची लागवड केली जाते. सुरुवातीला २४ हेक्टरमध्ये हा प्रयोग करण्यात आला. त्यात यश मिळाल्यावर आता १६ हजार हेक्टर क्षेत्रांमध्ये अशीच लागवड करण्यात येणार आहे. आता भारतात नवी मुंबईतील नवीन विमानतळाच्या ठिकाणी ही पद्धत वापरली जाणार आहे. त्यासाठी साहजिकच आधी सिडकोची रीतसर परवानगी घ्यावी लागेल. ठाणे खाडी, मुंबई पूर्व उपनगराचा भाग, पालघरचा भाग, डहाणूचा ‘भाग ब’ मुंबईतील नष्ट झालेल्या खारफुटींच्या ठिकाणी ही पद्धत वापरण्याचा सरकारचा विचार आहे. नेहमीच्या पद्धतीला प्रती १०० हेक्टरला २ कोटी रुपये खर्च येतो, तर एरियल पद्धतीला हाच खर्च फक्त २० लाखांवर येतो. गोवा राज्यातील प्रयोगानंतर चिपळूण येथील खारफुटी वाढीकरिता ड्रोनचा प्रयोग झाला. या प्रयोगात यश मिळाल्यावर सरकार हे खारफुटींचे संरक्षण करणे आणि इतर ठिकाणी मानवाविना ड्रोनचा वापर चालू करणार आहे.

 

नेहमीच्या लागवडींनी २०१२ ते २०१४ सालांमध्ये खारफुटीच्या बिया किती पेरल्या व किती टिकल्या?

 

खारफुटीच्या संरक्षण विभागांतर्गत राबविण्यात आलेल्या २०१५-१७ काळात वृक्षरोपणाच्या लागवडीतून मुंबई परिक्षेत्रातील खारफुटीच्या क्षेत्रात १६ चौ. किमीची वाढ झाली आहे.

 

चारकोप (८४,९७० चौ. किमी - ८ चौ. किमी), मालवणी (२४,३४२ चौ. किमी - १०,०२० चौ. किमी), मनोरी (९३,३२४ चौ. किमी – ७,००० चौ. किमी), भांडुप (२८,००० चौ. किमी – २७,६०० चौ. किमी), कोपरखैरणी (८,८०० चौ. किमी – ८,४०० चौ. किमी), ऐरोली (४०,६६३ चौ. किमी- ३६,५९६ चौ. किमी), गोठवली (३०,८८६ चौ. किमी -१९,४५८ चौ. किमी), कांजुरमार्ग (२२,२२० चौ. किमी – १७,५५३ चौ. किमी)

 

२०१७ च्या मापनक्षेत्रात वाढ वा तूट

 

महाराष्ट्रातील जंगलांची २०१५ व २०१७ मध्ये गणना केल्यावर खालीलप्रमाणे फरक आढळले.

 

• महाराष्ट्राचे भौगोलिक क्षेत्रफळ - ३ लाख ७ हजार ७१३ चौकिमी. दाट जंगलाचे क्षेत्रफळ - ८ हजार ७३६ चौ.किमी

 

• साधारण दाट जंगलाचे क्षेत्रफळ - २० हजार ६५२ चौ. किमी

 

• उघडे जंगल - २१ हजार २९४ चौ. किमी

 

• एकूण जंगल २०१७ च्या मापनाने - ५० हजार ६८२ चौ. किमी

 

• एकूण जंगल २०१५ च्या मापनाने - ५० हजार ६९९ चौ. किमी

 

• नवीन मापनाने घटलेले क्षेत्र - १७ चौ.किमी

 

रंतु खारफुटीच्या चौ. किमी क्षेत्रात वाढ झालेली दिसते.

मुंबई उपनगरे (४८ वरून ६४ चौ. किमी = ३३ टक्के वाढ); ठाणे (५९ वरून ९० चौ. किमी - ५२ टक्के वाढ); रायगड (७७ वरून १०६ चौ. किमी – ४०.६ टक्के वाढ) रत्नागिरी (२९ वरून ३० चौ. किमी – ३.४ टक्के वाढ); सिंधुदुर्ग (७ वरून १२ चौ. किमी – ७.१ टक्के वाढ) देशातील २०१७ मधील जंगलांच्या बेकायदा अतिक्रमणांच्या व्याप्तीत महाराष्ट्र क्षेत्र पाचव्या क्रमांकावर (कंसात भौगोलिक व अतिक्रमण क्षेत्र चौ.किमीमध्ये)

महाराष्ट्र (६१,५७९ चौ. किमी - ६७० चौ. किमी), ओडिशा (५८,१३६ चौ. किमी - ७५८ चौ. किमी), कर्नाटक (३८,२८४ चौ. किमी – ८२७ चौ. किमी), आसाम (२६,८३२ चौ. किमी – ३,१७२ चौ. किमी), मध्य प्रदेश (९४,६८९ चौ. किमी – ५,३४७ चौ. किमी). एकूण भारत (७,६४,५६६ चौ. किमी – १३,६१२ चौ. किमी).

 

महाराष्ट्रातील २०१७ मधील जिल्हावार अतिक्रमणांची संख्या व क्षेत्र हेक्टरमध्ये

ठाणे (४९,४६३ चौ. किमी - ९७३ चौ. किमी), मुंबई (३३,८५० चौ. किमी – ६,१७० चौ. किमी), धुळे (१५,०७६ चौ. किमी - २०७५७), गडचिरोली (८९६९ -१०,२९९ चौ. किमी), नाशिक (९,५९८ चौ. किमी – ३,८४५ चौ. किमी), चंद्रपूर (६,१८६ चौ. किमी - ५,८२८ चौ. किमी), नागपूर (३,५७३ चौ. किमी- २,९०६ चौ. किमी), पुणे (१,४४५ चौ. किमी- १९५ चौ. किमी).

 

उच्च न्यायालयाने नेमलेल्या समितीने असे सांगितले की, मुंबई शहरात कमीतकमी २२ हेक्टर खारफुटी क्षेत्र नष्ट झाले आहे. यात आयएनएस हमला मार्वे, एव्हरशाईन नगर - मालाड (प), चारकोप गाव प्रामुख्याने आहे. हे नष्ट झालेले क्षेत्र वानखेडे स्टेडियम क्षेत्राच्या १५ पट आहे. सरकारने विकास कामे करताना खारफुटी व पाणथळींच्या संरक्षणाच्या व संवर्धनाच्या कामाकडे लक्ष द्यावयास हवे.
 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/

 
@@AUTHORINFO_V1@@