उन्नत रेल्वे मार्गातील झोपडपट्ट्यांचे पुनर्वसन होणार

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    22-Aug-2018
Total Views |



 

 

ठाणे : रेल्वे स्थानकातील अतिरिक्त भार कमी करण्याच्या दृष्टिकोनातून ऐरोली-कळवा या महत्त्वाकांक्षी प्रकल्पाला राज्य शासनाने मंजुरी दिली होती. याअंतर्गत प्रकल्पातील बाधित झोपड्यांच्या पुनर्वसन प्रक्रियेला मुख्यमंत्र्यांकडून नुकतीच मंजुरी देण्यात आली आहे, त्यामुळे झोपडपट्टी पुनर्वसनाचे काम एमएमआरडीएकडून लवकरच सुरू करण्यात येणार आहे.
 

ऐरोली-कळवा या उन्नत रेल्वे मार्गाचे भूमिपूजन डिसेंबर, २०१६ रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते करण्यात आले होते. तत्कालीन रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांनी २०१५ च्या रेल्वेच्या अर्थ संकल्पात या प्रकल्पासाठी ४२८ कोटी रुपये मंजूर केले होते. मंजूर केलेला निधी परत जाऊ नये यासाठी हा प्रकल्प दोन टप्प्यांत पार पडणार आहे. यात दिघा रेल्वेस्थानकाच्या कामाला सुरुवातही झाली आहे. या प्रकल्पात कल्याण-डोंबिवली, ठाणे आणि नवी मुंबई शहराच्या विकासात महत्त्वाचा वाटा असलेल्या कळवा-ऐरोली उन्नत मार्गासह दिघा रेल्वेस्थानकाचा समावेश आहे. दिघा स्थानक उभारणीसाठीही रेल विकास महामंडळाने हालचाली सुरू केल्या आहेत. या स्थानकाच्या उभारणीसाठी रेल्वे पहिल्या टप्प्यात ५५ कोटी रुपये खर्च करणार आहे. मात्र, या प्रकल्पाच्या दुसऱ्या टप्प्यातील बाधित होणाऱ्या झोपड्यांचे पुनर्वसन करण्याची कबुलीही मुख्यमंत्र्यांनी दिली होती. मात्र या प्रकल्पाच्या बाधित होणाऱ्या झोपड्यांचे पुनर्वसन एमएमआरडीएकडून होत नसल्याचे लक्षात येताच लोकसभेत खा. राजन विचारे यांनी या संदर्भातील निवेदन मुख्यमंत्र्यांना केले होते. दि. १३ ऑगस्टला सिडको गृहनिर्माण योजना ऑनलाईनच्या उद्घाटनप्रसंगी मुख्यमंत्र्यांनी या प्रकल्पासंदर्भातील चर्चा एमएमआरडीएचे पुनर्वसन अधिकारी विश्राम पाटील यांच्याशी केली. या चर्चेनंतर बाधित झोपड्यांच्या पुनर्वसनाचा सुधारित आराखडा एमएमआरडीएत दाखल करण्यात आला आणि नुकतीच या आराखड्याला मंत्रिमंडळाकडून मंजुरीही मिळाली आहे. त्यामुळे या झोपडपट्टी पुनर्वसनाचे काम लवकरच मार्गी लागणार आहे.

 
 

असा असेल ‘उन्नत’ मार्ग

कल्याणकडून नवी मुंबईच्या दिशेने जाणाऱ्या प्रवाशांना ठाणे स्थानकातून पुढे जावे लागते. त्यामुळे ठाणे स्थानक गर्दीने ओसंडून वाहत आहे. ठाण्याची ही गर्दी कमी करण्यासाठी कळवा-ऐरोली उन्नत रेल्वे मार्गाचा प्रस्ताव २०१५ च्या अर्थसंकल्पामध्ये मंजूर करण्यात आला होता. त्यानंतर २०१७ च्या आणि यंदाच्या अर्थसंकल्पामध्येही यासाठी भरीव तरतूद करण्यात आली आहे. या प्रकल्पासाठी १ .८०३ किमी जमीन लागणार असून ठाणे महापालिकेच्या भोलानगर, न्यू शिवाजीनगर, मफतलाल कंपनी, ठाकूरपाडा या मार्गाने हा मार्ग जाणार आहे.

 
 
 
माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/ 
@@AUTHORINFO_V1@@