वाहकाचा निष्काळजीपणा भोवलाबस अर्धातास महामार्गावर थांबली

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    22-Aug-2018
Total Views |
 

वाहकाचा निष्काळजीपणा भोवला
बस अर्धातास महामार्गावर थांबली

 
जळगाव, 22 ऑगस्ट
जळगाव बस स्थानकातून मुक्ताईनगरकडे रवाना झालेली बस वाहकाच्या निष्काळजीपणामुळे महामार्गावर सुमारे अर्धातास थाबून होती. प्रवाशांनी आराडाओरड केल्या नंतर वाहकाला बस रवाना करणे भाग पडले.
 
बस क्रमांक एमएच 20 बीएल 3359 ही नाशिक - मुक्ताईनगर बस बुधवार रोजी सायंकाळी 5 वाजेला जळगाव बसस्थानकातून मुक्ताईनगरकडे रवाना झाली. परंतु वाहकाकडे तिकिट काढण्यासाठी असलेले यंत्राची चार्जींग संपल्याने वाहकाची अडचण झाली. महामार्गावर कालीका मंदिरा जवळ बस थांबवून यंत्र चार्ज करण्यात आले. यामुळे सुमारे 30 मिनीटे गाडी थांबून होती. त्यामुळे प्रवाशांची तारांबळ उडाली. प्रवाशांनी वाहकाशी हुज्जत घातल्याने वाहकास बस रवाना करावी लागली.
 
प्रवाशांचा बस वर विश्वास पण वाहकाचा निष्काळजीपणा
प्रवाशांची वाहतूक करणा-या कालीपिवळी पेक्षा बसचे भाडे अधिक आहे. असे असले तरी अनेक प्रवासी बसव्दारे प्रवास करणे पसंत करतात. तिकिट काढण्याचे यंत्र चार्ज झालेले नव्हते तर वाहकाने जळगाव बसस्थानकातच यंत्र चार्ज करुन घ्यावयाचे होते. बस स्थानक सोडून महामार्गावर गाडी थांबविल्याने प्रवाशांची पंचाईत झाली. धड गाडीतून उतरता येत नव्हते किंवा अन्य वाहनात जाता येत नव्हते. बसला विलंब झाल्याने अनेकांची कामे रखडली.
 
@@AUTHORINFO_V1@@