परळ येथील क्रिस्टल टॉवरला आग

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    22-Aug-2018
Total Views |




 

मुंबई: परळ येथील क्रिस्टल टॉवरला आग लागली आहे. क्रिस्टल टॉवरच्या १२ व्या मजल्यावर ही आग लागली आहे. टॉवरमधील १६ रहिवाशांना के.ई.एम रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. त्यापैकी ४ रहिवाशांचा मृत्यु झाला आहे. अग्निशमन दलाचे बचावकार्य सुरू आहे. अग्निशमन दलाचे जवान आग आटोक्यात आणण्याचे प्रयत्न करत आहेत. अग्निशमन दलाच्या १४ गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या आहेत.

 
 
 
 
क्रिस्टल टॉवरच्या या १२ व्या मजल्यावर एका घराच्या नूतनीकरणाचे काम सुरू होते. त्यादरम्यान ही आग लागली. आगीच्या ज्वाळा वाढत जाऊन मजल्यावरील आजूबाजूच्या इतर घरांनादेखील या आगीचा फटका बसला. आग लागल्यावर टॉवरच्या इमारतीत पळापळ सुरू झाली. या दरम्यान काही रहिवाशांनी टॉवरमधील लिफ्टचा वापर केला. लिफ्ट मध्येच बंद पडली. लिफ्टमध्ये गुदमरल्यामुळे २ रहिवाशांचा मृत्यु झाला आहे. त्यात एका वृद्ध महिलेचा व एका पुरुषाचा समावेश आहे. या आगीत आणखी २ जणांचा मृत्यु झाला असल्याचे कळते. त्यामुळे मृतांचा आकडा ४ वर गेला आहे.
 

याप्रकरणी महापौर विश्वनाथ महाडेश्वर यांनी चौकशीचे आदेश दिले आहेत. 

'क्रिस्टल टॉवरला आग लागली, त्याची सर्वंकष चौकशी करण्यात येईल. इमारत बांधणाऱ्या विकासकाने ओसी घेतली की नाही , त्याने काही त्रुटी ठेवल्या होत्या का हे सर्व चौकशी मधून समोर येईल . जर तो विकासक दोषी आढळला तर त्यावर कठोर कारवाई करण्यात येईल'.

-विश्वनाथ महाडेश्वर, महापौर

 
 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/

 
 
@@AUTHORINFO_V1@@