म्हसलेला नाला खोलीकरणाचा शुभारंभगाव टंचाईमुक्त करण्याचा आ. शिरीष चौधरी यांचा मानस

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    22-Aug-2018
Total Views |

 

म्हसलेला नाला खोलीकरणाचा शुभारंभ
गाव टंचाईमुक्त करण्याचा आ. शिरीष चौधरी यांचा मानस

 
अमळनेर , २२ ऑगस्ट
तालुक्यातील म्हसले येथे नाला खोलीकरणाच्या कामाचा आ.शिरीष चौधरीच्या हस्ते शुभारंभ करण्यात आला. हिरा उद्योग समूहाच्या स्वनिधीतून हे नालाखोलीकरणाचे काम हाती घेण्यात आले असून या कामांच्या माध्यमातून या गावास टंचाईमुक्तीकडे नेण्याचा मानस आ.चौधरी यांनी यावेळी व्यक्त केला.
म्हसले गावात पिण्याच्या पाण्याची प्रचंड टंचाई असल्याने येथील ग्रामस्थांनी आ. चौधरी यांची भेट घेऊन टंचाईची व्यथा मांडली. नाला खोलीकरणाबाबतची भूमिका मांडली होती. दरम्यान त्यानंतर त्यांनी लागलीच हिरा उद्योग समूहाचे चेअरमन डॉ. रविंद्र चौधरी यांच्या सहकार्याने हिरा उद्योगाच्या स्वनिधीतून नाला खोलीकरण करण्याचे नियोजन केले. त्यामुळे आ. चौधरी यांचे ग्रामस्थांनी आभार मानले. यावेळी किरण गोसावी, राजेंद्र पाटील, सुनील भामरे, किशोर मराठे, संतोष पाटील, भरत पाटील, भूषण पाटील, सुभाष पाटील, दीपक पाटील, रवींद्र पाटील, योगेश पाटील, गुलाब आगळे, हेमंत चौधरी, समाधान पाटील उपस्थित होते.
------------------
हिरा उद्योग समुहाचे सहकार्य
हिरा उद्योग समूहाच्या सी.एस.आर.निधीतून नाला खोलीकरण झालेली गावे नगाव, खेडी, खवशी, कुर्हे, पातोंडा, दहिवद, पाडसे, जवखेडा, सबगव्हान,मुडी, ढेकूसीम, देवगाव देवळी, पिपळें, खेडी व्यवहारदाळे, शिरसाळे, मारवड, गांधली, चोपडाई, मठगव्हाण, रामेश्वर, नांद्री, रणाईचे, गलवाडे, शेळावे, कंकराज, अंबरीश टेकडी, पर्ल स्कूल जवळ, मंगळ ग्रह मंदिर परिसर, वर्णेश्वर मंदिर परिसरातील गावांचा सामावेश आहे.
 
 
 
@@AUTHORINFO_V1@@