सण, उत्सवकाळात सार्वजनिक स्वच्छतागृहे स्वच्छ ठेवा : आयुक्त

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    22-Aug-2018
Total Views |



ठाणे : शहरात सण उत्सव काळात नागरिकांची गैरसोय होऊ नये याकरिता सर्व स्वच्छतागृहे अद्ययावत व स्वच्छ ठेवण्याचे आदेश ठाणे महानगरपालिका आयुक्त संजीव जयस्वाल यांनी सर्व स्वच्छता निरीक्षकांना दिले आहेत. सार्वजनिक गणेशोत्सव येत्या काही दिवसांवर येऊन ठेपला असून या पार्श्वभूमीवर आयुक्तांनी हे आदेश दिले आहेत. ठाणे शहरात एकूण १५० सार्वजनिक स्वच्छतागृहे आहेत. या सर्व स्वच्छतागृहांची साफसफाई काही सामाजिक संस्थांकडून केली जाते तर, काही स्वच्छतागृहांची साफसफाई महापालिकेच्या माध्यमातून करण्यात येते. प्रत्येक प्रभागातील स्वच्छता निरीक्षकांनी आपल्या प्रभागातील स्वच्छतागृहाची प्रत्यक्ष पाहणी करून स्वच्छतागृहे स्वच्छ ठेवण्याबाबतची कार्यवाही करण्याच्या सूचना जयस्वाल यांनी दिल्या आहेत. ठाणे शहरात सार्वजनिक गणेशोत्सव काळात सार्वजनिक गणपती, सजीव देखावे पाहण्यासाठी नागरिक मोठ्या प्रमाणात बाहेर पडतात. अशावेळी त्यांची गैरसोय होऊ नये, या पार्श्वभूमीवर हा निर्णय अतिशय महत्त्वाचा आहे.

 
 
 माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/
@@AUTHORINFO_V1@@