ज्येष्ठ काँग्रेस नेते गुरुदास कामत यांचे निधन

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    22-Aug-2018
Total Views |

 
 
नवी दिल्ली : काँग्रेसचे ज्येष्ठ नेते गुरुदास कामत यांचे आज सकाळी हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने निधन झाले. ते ६३ वर्षांचे होते. दिल्ली येथील प्रिमस रुग्णालयात त्यांना दाखल करण्यात आले होते. मात्र त्यांची प्राणज्योत मालवली.
 
काँग्रेसच्या माजी अध्यक्षा सोनिया गांधी आणि ज्येष्ठ नेते अहमद पटेल यांनी प्रिमस रुग्णालयाला भेट दिली. कामत यांच्या जाण्याने काँग्रेस आणि मुंबई काँग्रेसला मोठा धक्का बसला आहे.
 
 
 
ते केंद्रात २००९ ते २०११ दरम्यान गृहराज्यमंत्री होते. यावेळी त्यांनी माहिती तंत्रज्ञान आणि प्रसारण मंत्रीपदाचा अतिरिक्त भार संभाळला. जुलै २०११ मध्ये त्यांनी आपल्या मंत्रीपदाचा राजीनामा दिला होता. काँग्रेस पक्षाने कामत यांना पक्षाचा महासचिव बनविले होते आणि राजस्थान, गुजरात, दादरा-नगरहवेली आणि दमण-द्विप येथील प्रभारी केले. ते काँग्रेस पक्षाच्या उच्चस्तरीय निर्णय मंडळाचे (कार्यकारी समिती) सदस्य होते.
त्यांच्या जाण्याने राजकीय क्षेत्रात हळहळ व्यक्त केली जात आहे. काँग्रेस पक्षाने शोक व्यक्त केला आहे.
@@AUTHORINFO_V1@@