अटलबिहारी वाजपेयी यांच्या अस्थिकलशांची राज्यात निघणार यात्रा

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    22-Aug-2018
Total Views |
 
 
नवी दिल्ली :  माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांच्या निधनानंतर त्यांच्या अस्थिविसर्जनाआधी सर्व राज्यांना त्यांचे अस्थिकलश सोपविण्यात येणार आहेत. तसेच या अस्थिकलशांची यात्रा देखील काढण्यात येणार आहे, जेणे करून प्रत्येक राज्यातील नागरिकांना वाजपेयी यांच्या अस्थिकलशांचे दर्शन घेता येईल.
 
आज पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भारतीय जनता पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा विविध राज्यांच्या भाजप अध्यक्षांना अस्थिकलश सोपविणार आहेत. त्यानंतर प्रत्येक राज्यात त्यांच्या अस्थिकलशाची यात्रा देखील काढण्यात येणार आहे.
 
अटलबिहारी वाजपेयी यांचे वयाच्या ९३ व्या वर्षी १६ ऑगस्ट २०१८ रोजी प्रदीर्घ आजाराने निधन झाले. त्यांच्यावर दिल्लीच्या स्मृतिस्थळ येथे अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांच्या जाण्याने राजकीय आणि सामाजिक क्षेत्रात एक मोठी पोकळी निर्माण झाली आहे.
@@AUTHORINFO_V1@@