वरणगाव ग्रामिण रुग्णालयाच्या बांधकामाला ब्रेक रुग्णांना प्राथमिक उपचारानंतर पाठविले जाते जिल्हा रुग्णालयात

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    22-Aug-2018
Total Views |
 
 
 

वरणगाव ग्रामिण रुग्णालयाच्या बांधकामाला ब्रेक
रुग्णांना प्राथमिक उपचारानंतर पाठविले जाते जिल्हा रुग्णालयात

वरणगाव, २२ ऑगस्ट
येथील सर्व राजकिय पक्षांच्या प्रयत्नाने मंजूर झालेल्या ग्रामिण रूग्णालयाच्या तिसर्‍या टप्प्यातील आंतर रुग्ण विभागाचे बांधकाम अद्यापही रखडले आहे. त्यामुळे रुग्णाना याठिकाणी दाखल करता येत नसून जळगाव येथे सामान्य रुग्णालयात रवाना करावे लागत आहे. वैद्यकीय अधिक्षक देवर्षी घोषाल यांनी सार्वजनिक बांधकाम विभाग आणि जिल्हा रुग्णालयाचे शल्यचिकित्सक यांचेकडे वारंवार पाठपुरावा केला आहे. मात्र पुढिल कार्यवाही होत नसल्याने नाराजी व्यक्त होत आहे.
 
 
शहरासह परीसरातील ग्रामिण विभागाची वाढती लोकसंख्या आणि शहरातून जाणार्‍या महामार्ग, लोहमार्गावर होणार्‍या अपघातांची पार्श्वभूमी लक्षात घेता सन २००० पासून येथील सर्व राजकिय पक्षांच्या पदाधिकार्‍यांनी वरणगाव येथे ग्रामिण रूग्णालय व्हावे त्याकरीता पाठपुरावा सुरू केला होता. सन २०१० मध्ये या कामास प्रशासकिय मान्यता पूर्ण होऊन ग्रामिण रूग्णालयाला मंजूरी मिळाली होती. मात्र येथील पूर्वीपासुनचे जिल्हा परिषदेचे प्राथमिक आरोग्य केंद्र कठोरा येथे हलवून त्याच जागेवर ग्रामिण रुग्णालय बांधकामाचे आरोग्य विभागाने नियोजन केले होते. सन २०१३ मध्ये सर्व शासकिय, प्रशासकिय, जिल्हा प्रशासकियआरोग्य विभागांची मान्यता पूर्ण करून रूग्णालयाची बाह्यरूग्ण तपासणी विभाग व प्रशासकिय आरोग्य विभाग, आंतररूग्ण विभाग आणि कर्मचारी वैद्यकिय निवासस्थाने असे तीन टप्प्यांमध्ये वेगवेगळ्या इमारतीचे बांधकामे मंजूर करण्यात आले होते त्यावेळी सार्वजनिक बांधकाम विभागाने तत्कालीन पालकमंत्री आ. संजय सावकारे यांचेकडून भूमिपुजन करून बांधकामास सुरुवात केली होती. सन २०१५ मध्ये ग्रामिण रूग्णालयाची बाह्यरुग्ण व प्रशासकिय तसेच कर्मचारी वैद्यकिय वसाहत अशा दोन इमारतीचे बांधकामे पूर्ण करून सार्वजनिक बांधकाम विभागाने जिल्हा शल्यचिकित्सक विभागाकडे दिले होते. जिल्हा आरोग्य विभागाने इमारती ताब्यात घेऊन कर्मचार्‍यांना रहिवास आणि बाहय रूग्णसेवा सुरू केली होती. त्यानंतर आंतररुग्ण विभागाच्या मंजूर असलेल्या बांधकामाला अद्याप पर्यंत सुरुवात झाली नाही.
तर रुग्णांचे प्राण वाचू शकतील
येथील सेवा रुग्णांना पुरेशा नाहीत त्याकरीता ग्रामिण रूग्णालयाच्या तिसर्‍या टप्प्यातील आंतररूग्ण विभागाचे बांधकाम करणे रुग्ण कल्याणाच्या दृष्टीने अपेक्षीत आहे. त्यामुळे अद्यावत सेवा महिलांची डिलेव्हरी, लहान मोठ्या शस्त्रक्रिया, अतिदक्षता विभाग, अपेक्षित वैद्यकिय अधिकारी आणि कर्मचारी वर्ग मिळेल तर अपघातातील अति गंभीर रूण जळगाव नेत असतांना उपचाराअभावी दगावतात अशा रुग्णांना जिवनदान मिळणार आहे.
 
@@AUTHORINFO_V1@@