माळशेज घाटात दरड कोसळली, वाहतूक ठप्प

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    21-Aug-2018
Total Views |
 
 
 
 
ठाणे : पावसाळ्यात पर्यटकांचे आवडते स्थळ म्हणजे म्हाळशेज घाट. या घाटात निसर्गरम्य दृश्य दिसत असले तरी देखील येथे अनेकदा पर्यटकांना समस्या सहन कराव्या लागतात. आज पहाटेच्या वेळी म्हाळशेज घाटात दरड कोसळल्यामुळे वाहतूक कोंडी झाली आहे.
 
 
या घटनेनंतर खबरदारीचा उपाय म्हणून मुरबाड-नगर महामार्गावरील दोन्ही बाजूंची वाहतूक पुर्णतः थांबविण्यात आली आहे. त्यामुळे नागरिकांना मोठ्या प्रमाणात त्रास सहन करावा लागत आहे.
 
 
महामार्ग प्राधिकरणाचे अधिकारी, कर्मचारी तसेच महसूल विभागाचे कर्मचारी व पोलीस घटनास्थळी पोहचले आहेत. घाटातील धुक्याचा अंदाज घेऊन दरड हटविण्याचे काम तातडीने सुरू करण्यात येत असल्याची माहिती निवासी उपजिल्हाधिकारी शिवाजी पाटील यांनी दिली.
 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/

 
@@AUTHORINFO_V1@@