यूएईकडून केरळमधील पूरग्रस्तांना ७०० कोटींची मदत

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    21-Aug-2018
Total Views |



 

तिरुवनंतपुरम : संयुक्त अरब अमिरातीने केरळमधील पूरग्रस्तांना ७०० कोटींची मदत केली आहे. अशी माहिती केरळचे मुख्यमंत्री पीनरयी विजयन यांनी दिली आहे. केरळमधील पूरग्रस्तांना मदत करण्यासाठी युएईने एक आपत्कालीन समिती स्थापन केली होती. केरळमधील पूरग्रस्त नागरिकांच्या समुदायाच्या प्रतिनिधींची युएई सरकार भेट घेणार आहे.

 

 

 
 केरळमधील बहुतांश लोकं हे नोकरीनिमित्त युएईमध्ये राहत आहेत. सुमारे २ दशलक्ष भारतीय युएईत कामानिमित्त राहत आहेत. त्यांचे प्रमाण तेथील लोकसंख्येच्या २७ टक्के आहे. युएईचे उपाध्यक्ष शेख मोहम्मद यांनी ट्विटरवरून केरळसाठी लोकांना मदतीचे आवाहन केले होते. मल्याळम भाषेतून त्यांनी हे आवाहन केले होते. मल्याळम ही केरळची राज्यभाषा आहे. या ट्विटसोबत त्यांनी केरळमधील पूरस्थितीचे फोटोही पोस्ट केले होते. ‘केरळमधील लोक हे युएईच्या यशाचा एक भाग आहेत. ईदच्या या पवित्र दिवसांमध्ये केरळमधील नागरिकांना मदत करण्याची आपल्या सर्वांवर जबाबदारी आहे’. असे त्यांनी ट्विट केले होते.
 
 
 
 
 माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/
@@AUTHORINFO_V1@@