छायाचित्रकारांनी समस्या सोडविण्यासाठी एकत्र यावे

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    21-Aug-2018
Total Views |

प्रेस फोटोग्राफर फाउंडेशनतर्फे आयोजित फोटोग्राफी दिनात मान्यवरांचे प्रतिपादन

 
 

 
 
जळगाव :
जागतिक छायाचित्रण दिवस जळगाव शहर पत्रकार संघाच्या सभागृहात साजरा करण्यात आला. छायाचित्रकारांच्या समस्या सोडविण्यासाठी सर्वांनी एकत्रित येण्याची गरज असल्याचे मत यावेळी उपस्थितांनी व्यक्त केले.
 
 
प्रमुख पाहुणे पत्रकार संघाचे विश्वस्त अशोक भाटिया, अध्यक्ष दिलीप शिरोळे, इंडियन रेडक्रॉस सोसायटीचे सदस्य राजेश यावलकर, प्रेस फोटोग्राफर फाउंडेशनचे अध्यक्ष हेमंत पाटील जळगावकर आदी मान्यवर व्यासपीठावर उपस्थित होते.
 
 
सुरुवातीला माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी, लोकसभेचे माजी अध्यक्ष सोमनाथ चॅटर्जी, जागतिक दर्जाचे क्रिकेटर अजित वाडेकर, जळगावचे पत्रकार संदीप जाधव यांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. ज्येष्ठ फोटोग्राफर शब्बीर सैयद यांची विद्यापीठात सिनेट सदस्य म्हणून निवड झाल्याने त्यांचा सत्कार पांडुरंग महाले यांनी केला.
 
 
सूत्रसंचलन हर्षल पाटील, प्रास्ताविक अभिजित पाटील यांनी केले. प्रेस फोटोग्राफर फाउंडेशनचे उपाध्यक्ष सचिन पाटील, सहसचिव संदीपाल वानखेडे, प्रकाश लिंगायत, अरुण इंगळे, भूषण हंसकर, जुगल पाटील, धर्मेंद्र राजपूत, भूषण पाटील यांचे सहकार्य लाभले. पोलीस फोटोग्राफर जयंत चौधरी, उमविचे शैलेश पाटील, जैन इरिगेशनचे छायाचित्रकार रानाजी, राजू हरीमकर, चंद्रशेखर नेवे, अय्याज मोहसीन, वैभव धर्माधिकारी, सतीश साळी, सतीश जगताप, योगेश चौधरी, शुभम जगताप, संजय वडनेरे, अतुल वडनेरे, शिव पुरोहित, मतीन सैयद, रितेश भाटिया, बंटी बारी, संतोष ढिवरे, विजय बारी आदी उपस्थित होते.
 
दिव्यांग चिमुकल्यांनी घेतले फोटोग्राफीचे धडे
फोटो जर्नलिस्ट फाउंडेशनतर्फे कॅमेरा पूजन
जळगाव :
जागतिक छायाचित्र दिनानिमित्त शहरातील फोटो जर्नलिस्ट फाउंडेशनतर्फे कंवरनगर येथील अपंग संमिश्र केंद्रातील दिव्यांग चिमुकल्यांना फोटोग्राफीचे धडे देण्यात आले.
 
 
अपंग संमिश्र केंद्रात एलसीबीचे निरीक्षक सुनील कुराडे, एमआयडीसी पोलीस ठाण्याचे निरीक्षक अनिरुद्ध आढाव, जिल्हापेठ पोलीस ठाण्याचे सहाय्यक निरीक्षक संदीप आराक यांच्यासह दिव्यांग चिमुकल्यांच्या हस्ते कॅमेरा पूजन करण्यात आले. फोटो जर्नलिस्ट फाउंडेशनतर्फे दिव्यांग चिमुकल्यांना अल्पोपहारदेखील देण्यात आला.
 
 
प्रास्ताविक राकेश वाणी यांनी केले तर आभार वसीम खान यांनी मानले. यशस्वितेसाठी फाउंडेशनचे आबा मकासरे, नितीन सोनवणे, गोकुळ सोनार, निखिल सोनार, उमेश चौधरी, सूर्यभान पाटील, यूथ फॉर हेल्प फाउंडेशनचे चेतन वाणी, जकी अहमद, मयूर विसावे, शाकीर खाटीक, चंदन मोरे, महेश चिंचोलकर, सनी भालेराव, अरुण इंगळे, संतोष धिवरे आदींनी परिश्रम घेतले.
 
सेंटर फॉर मास मीडिया डिपार्टमेंटतर्फे जागतिक फोटोग्राफी दिवस साजरा
डॉ. अण्णासाहेब जी. डी. बेंडाळे महिला महाविद्यालयात सेंटर फॉर मास मीडिया डिपार्टमेंटमध्ये जागतिक फोटोग्राफी दिवस साजरा करण्यात आला. प्राचार्य डॉ. एस. एस. राणे, केंद्र समन्वयक प्रा. जयेंद्र लेकुरवाळे यांच्या हस्ते कॅमेराचे पूजन करण्यात आले. यावेळी संतोष सोनवणे, जितेंद्र वानखेडे, हर्षल भाटिया, सचिन कुंभार आदी उपस्थित होते.
 
@@AUTHORINFO_V1@@