‘आश्रय’मधील मुलांनी बनविल्या आकर्षक सप्तरंगी राख्या

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    21-Aug-2018
Total Views |

चिमुकले राम मंदिरासमोरील ’क्षुधा शांती’ लगतचा स्टॉल ठरतोय लक्षवेधक

 
 
जळगाव :
‘जगात असती कितीक नाती गोती,
परी सुखाची माणिक मोती बहिण-भाऊ’
या प्रेममय, उदात्त सुत्रांची आठवण देणार्‍या रक्षाबंधननिमित्त केशवस्मृती सेवा समूह संचलित स्टॉल लक्षवेधक ठरत आहे.
प्रतिष्ठानच्या ‘आश्रय-माझे घर’ या मतिमंदासाठी चालवल्या जाणार्‍या समाजसेवी कार्यातील निवासी वसतीगृहातील १५-१६ आणि ‘डे-केअर’ प्रकल्पातील ७-८ विद्यार्थ्यांनी आशावाद निर्माण करणारी, त्यांच्यासह त्यांच्या पालकांच्या आणि सर्वच समाजाच्या अंतःकरणात उन्मेषाचे, आनंदाचे दीप उजळवणारी ही कर्तबगारी आहे.
 
 
डे-केअर म्हणजे अशा मुलांना त्यांच्या घरुन विशेष वाहनाने मुलांना सकाळी ९ ते ५ या वेळात ‘आश्रय’मध्ये आणले जाते आणि त्यांना स्वयंआनंद किंवा रोजगाराभिमुख प्रशिक्षण देणे होय. गेल्या काही महिन्यांपासून हा उपक्रम सुरू झालेला आहे. या सार्‍या विद्यार्थ्यांच्या प्रशिक्षणाची फलश्रृती म्हणजे या विविध प्रकारच्या सुबक आणि आकर्षक राख्या होत.
 
 
वाढता प्रतिसाद लक्षात घेऊन यावर्षी पूर्वतयारी दीड महिना आधीपासून या मुलांनी चालविली आहे. या स्टॉलला सर्व स्तरातील माता-भगिनी, नागरिकांनी आर्वजून भेट द्यावी. या मुलांच्या कलाकौशल्याला आणि स्वावलंबी होण्याच्या प्रयत्नांना पाठबळ द्यावे.तसेच त्यांच्या मनोमन दुःखी, कष्टी पालकांना मानसिक व भावनिक बळ द्यावे असे आवाहन या स्टॉलचे व्यवस्थापक ‘आश्रय’मधील काळजी वाहक राहुल नेमाडे यांनी तरुण भारतने साधलेल्या संवादाद्वारे केलेले आहे.
 
स्टॉलवर उपलब्ध चीजवस्तू
* सप्तरंगी राख्या तसेच सुगंधी अगरबत्ती आणि पेपर बॅग
(मेडिसिन पॅकेट - ६ इंची आकाराचे कागदी पॅकेट, औषधी किंवा अन्य वस्तू ठेवण्यासाठी उपयुक्त)
* राख्यांमध्ये ६ प्रकारच्या राख्या विविध आकार, प्रकारात...दर प्रत्येकी १० ते २० रुपये, प्लॉस्टिकमुक्त
* मोगरा व जास्वंद या सुगंधी अगरबत्ती पॅकेट, त्यात विविध काड्या, १ इंच जास्त लांबीमुळे दीड ते दोन तास सुगंध देण्याची
क्षमता, वाजवीदर प्रती पॅकेट १५ रुपये
* स्टॉलचा कालावधी रक्षाबंधन रविवार दिनांक २६ पर्यंत रोज सकाळी १० ते सायंकाळी ७ वाजेपर्यंत.
@@AUTHORINFO_V1@@