राष्ट्रीय योगा स्पर्धेसाठी श्रध्दा लढ्ढा-मुंधडा यांची निवड

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    21-Aug-2018
Total Views |

राज्यस्तरीय स्पर्धेत पटकावले सुवर्णपदक

 
जळगाव :
योगाच्या क्षेत्रात देशपातळीवरच नव्हे तर, परदेशातही विविध स्पर्धांमध्ये गुणवत्ता, परिश्रम आणि सातत्यपूर्ण सादरीकरणातून अनेक पुरस्कार आणि विक्रमांची मानकरी ठरलेल्या श्रध्दा लढ्ढा-मुंधडा यांची राज्यस्तरीय स्पर्धेतून पतियाळा येथे १८ ते २२ नोव्हेंबरदरम्यान होणार्‍या राष्ट्रीय स्पर्धेसाठी निवड झाली आहे.
 
 
कोपरगाव, जि. अहमदनगर येथे झालेल्या राज्यस्तरीय स्पर्धेत विविध गटातून सुमारे ५५० वर स्पर्धकांनी सहभाग घेतला होता. या स्पर्धेत त्यांनी वैयक्तिक गटात प्रथम क्रमांकासह सुवर्णपदक पटकावले होते. त्यामुळे त्यांची राष्ट्रीय स्पर्धेसाठी निवड करण्यात आली. या स्पर्धेत त्या महाराष्ट्राचे प्रतिनिधीत्व करतील. यापूर्वी झालेल्या राष्ट्रीय , आंतरराष्ट्रीय योगा स्पर्धेतूनही त्यांनी ३ सुवर्णपदके पटकावून आपल्या नैपुण्याने सर्वांना थक्क केले होते. श्रध्दा या प्रख्यात उद्योजक आणि माधव बहुउद्देशीय प्रतिष्ठानचे अध्यक्ष रवींद्र लढ्ढा यांच्या स्नुषा आहेत. या यशाबद्दल त्यांचे सर्वत्र अभिनंदन करण्यात येत आहे.
@@AUTHORINFO_V1@@